अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये सध्या रिमेकचा ट्रेंड आहे. अनेक जुन्या आणि गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक येत आहेत. ऐंशीच्या दशकातील एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘अर्थ’. 1982 साली महेश भट दिग्दर्शित अर्थ चित्रपट प्रदर्शित झाला होता. अर्थमध्ये स्मिता पाटील, शबाना आझमी आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याकाळी हा चित्रपट प्रंचड गाजला होत्या. यातील स्मिता पाटील यांची भूमिका आजही अजरामर आहे. आता पुन्हा अर्थ चित्रपट तयार करण्यात येणार आहे. 2017 साली या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा करण्यात आली होती. शरद चंद्र अर्थचा रिमेक करत आहेत. या चित्रपटातील रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारण्यासाठी एका अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका जॅकलिन फर्नांडिस साकारणार आहे अशी चर्चा आहे. मात्र असं असलं तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा निर्माता आणि  दिग्दर्शित यांच्याकडून करण्यात आलेली नाही. जर ‘जॅकलिन’ स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार असेल तर चाहत्यांकडून अपेक्षा नक्कीच वाढणार आहेत. कारण अर्थमधील स्मिता पाटील यांची भूमिका साकारणं हे एक प्रकारे मोठं आव्हान आहे. जॅकलीनला या भूमिकेसाठी प्रंचड मेहनत घ्यावी लागणार आहे.


smita patil %281%29


या भूमिकेसाठी जॅकलिनच्या नावाची चर्चा


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जॅकलिनला या चित्रपटाविषयी विचारण्यात आलं असून जॅकलीन ही भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. ‘अर्थ’हा चित्रपट एका संवेदनशील विषयावर आधारित होता. आता अर्थच्या रिमेकमध्ये कथानक तेच असेल की बदलण्यात येणार आहे हे असून जाहीर करण्यात आलेले नाही. शिवाय इतर कलाकारांच्या भूमिका कोण साकारणार याबाबत देखील कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र अर्थ चित्रपटाचा रिमेक व्हावा असे चाहत्यांना नक्कीच वाटत  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य अभिनेत्री रेवथी करण्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाच्या रिमेकबाबत उत्सुक आहेत.


jacqueline


स्मिता पाटील यांची भूमिका साकारणं आव्हानात्मक


स्मिता पाटील एक दिग्गज कलाकार होत्या. त्यांनी आपल्या सक्षम अभिनय आणि दिलखेचक सौंदर्यामुळे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं होतं. वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र कमी वयातच त्यांनी फार मोठ यश अभिनय क्षेत्रात मिळवलं होतं. श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. स्मिता पाटील यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केलं. अनेक चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले. कसदार अभिनयाने त्यांनी अनेक चित्रपट अजरामर केले होते. आक्रोश, मंथन, भूमिका, उंबरठा. चक्र, मिर्च मसाला, जैत रे जैत हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘अर्थ’ हा चित्रपट त्यापैकीच एक आहे. आता अर्थचा रिमेक होत असल्यामुळे स्मिता पाटील यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होत आहे. अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका कोण साकारणार हे जरी अधिकृत झालं नसलं तरी जॅकलिनचं नाव यासाठी पुढे आलं आहे. स्मिता पाटील यांची भूमिका कोणीही साकारली तरी ती साकारणं ही त्या अभिनेत्रीसाठी नक्कीच आव्हानात्मक असेल हे मात्र खरं.


smita patil 2 %281%29


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम