जॅकलिनने शेअर केली प्रेमाची निशाणी, चाहत्यांनी दिली ही खास प्रतिक्रिया

जॅकलिनने शेअर केली प्रेमाची निशाणी, चाहत्यांनी दिली ही खास प्रतिक्रिया

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. जॅकलिनने तिचा मिरर सेल्फी शेअर केला असून त्यात ती तिचे कपिंग थेरपी मार्क दाखवत आहे. जॅकलिनने कपिंग थेरपी करत खांद्यावर प्रेमाची निशाणी म्हणजेच लाल रंगाचे ह्रदय तयार आहे. जॅकलिनचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी यावर खास प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. 

जॅकलिनच्या अंगावर कोणाच्या प्रेमाची निशाणी

जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. तिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा खास फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने व्हाईट ब्रालेट परिधान केली आहे. जॅकलिनने खांद्यावर लाल रंगाचे ह्रदय म्हणजेच प्रेमाची निशाणी गोंदवल्यामुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. जॅकलिनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाच आहे पण चाहत्यांच्या प्रश्नामुळे तो त्यावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी जॅकलिनला प्रश्न विचारला आहे की, हे खास ह्रदय सलमान खानसाठी आहे का ? चाहत्यांनी या निशाणीचं कनेक्शन थेट बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या प्रेमाशी लावलं आहे. आता सलमानच्या प्रेमाचा प्रश्न निर्माण झाल्यावर चर्चा तर रंगणारच ना...कारण मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये जॅकलिन आणि सलमान खान यांनी पनवेलमधील सलमानच्या फार्म हाऊसवर क्वालिटी टाईम स्पेंड केला होता. जॅकलिन सलमानची खास मैत्रीण आहे. शिवाय चाहत्यांना सलमानच्या लग्नाची खूपच घाई झालेली आहे. ज्यामुळे सर्वांना आता सलमान आणि जॅकलिनचं लव्ह कनेक्शन असण्याची शंका वाटू लागली आहे. असो, या फोटोवर जॅकलिनने मात्र फक्त "आय अॅम हुक्ड" असं शेअर केलं आहे. 

कपिंग थेरपी म्हणजे काय ?

कपिंग थेरपी करणारी जॅकलिन पहिलीच सेलिब्रेटी नाही. कारण यापूर्वी दिशा पटनी, टायगर श्रॉफ अशा अनेक कलाकारांनी ती केलेली आहे. या थेरपीमध्ये काचेचे छोटे कप गरम करून अंगावर लावले जातात. या थेरपीने त्वचा खेचली जाते सक्शनमुळे रक्तप्रवाह गोळा होतो आणि कपिंगचे निशाण अंगावर निर्माण होते. सक्शनमुळे रक्तप्रवाह सुधारत असल्यामुळे ही थेरपी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरते. ताणतणाव कमी करण्यासाठी, सर्दी खोकला कमी करण्यासाठी, त्वचेच्या समस्यांसाठी, त्वचेवरील वेदना कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी कपिंग थेरपी केली जाते. असं म्हणतात की या थेरपीनंतर त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येतो. त्यामुळे बॉलीवूड कलाकारांनाही या थेरपीचं वेड लागलं आहे. थोडक्यात सध्या तरी जॅकलिन सलमानच्या नाही तर कपिंग थेरपीच्या प्रेमात पडली आहे असं म्हणायला हरकत नाही.

जॅकलिनचे आगामी चित्रपट

जॅकलिन फर्नांडिस लवकरच अक्षय कुमारसोबत रामसेतूमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नुसरत भरूचादेखील असेल. या चित्रपटाच्या मुहुर्तासाठी सगळी स्टार कास्ट अयोध्याला गेली होती. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय जॅकलिनने बच्चन पांडे या चित्रपटाचे शूटिंगदेखील नुकतंच पूर्ण केलं आहे. या चित्रपटातदेखील तिच्यासोबत अक्षय कुमार आणि क्रिती सेनन आहे. सलमान खाससोबत ती किकच्या सीक्वलमध्ये पुन्हा दिसणार आहे.