अचानक जॅकलिनने सोडले सलमान खानचे फार्महाऊस, काय आहे नक्की कारण

अचानक जॅकलिनने सोडले सलमान खानचे फार्महाऊस, काय आहे नक्की कारण

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सलमान खानबरोबर त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर राहात होती. पण आता अचानक जॅकलिनने सलमानचे फार्महाऊस सोडण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जॅकलिन गेल्या तीन महिन्यांपासून सलमानच्या कुटुंबीयांसह फार्महाऊसवर राहात होती. मात्र आता तिने एका रात्रीत फार्महाऊस सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे नक्की असे काय घडले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण काहीही वाईट झालेले नसून जॅकलिनने आपल्या मैत्रिणीसाठी असा निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे. 

या आहेत बॉलीवूडमधील स्टायलिश बहिणी, संपूर्ण जग करतं स्टाईल फॉलो

मैत्रिणीला जाणवतोय एकटेपणा

लॉकडाऊन  झाल्यापासून सलमान खानच्या फार्महाऊसवर त्याचे मित्रमैत्रिणी राहात आहेत. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस, वलुशा डिसुझा, लुलिया वंतुर, सलमानची बहीण अर्पिता, आयुष शर्मा, तिची दोन मुलं, सलमानचे काही मित्र यांचा समावेश आहे. जॅकलिन आणि सलमानने याच फार्महाऊसवर एक गाणंही चित्रित केले असून लॉकडाऊनच्या काळात हा अल्बम खूपच प्रसिद्ध झाला होता. त्याशिवाय सलमानच्या फार्महाऊसवरील अनेक फोटोजदेखील जॅकलिन आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत होती. मात्र जॅकलिनच्या एका जवळच्या मैत्रिणीला इथे एकटेपणा जाणवू लागला आणि तिला काही बाबतीत नैराश्य आल्यामुळे तिच्याजवळ राहणं जॅकलिनला अधिक योग्य वाटलं म्हणून जॅकलिनने एका रात्रीत सलमानचे फार्महाऊस सोडण्याचा निर्णय घेतला. जॅकलिन नेहमीच इतरांना मदत करताना दिसून आली आहे. तिच्यासाठी तिचे मित्रमैत्रिणी हे खूपच जवळचे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत मैत्रिणीला एकटं सोडून देणं तिला योग्य न वाटल्यामुळे तिने आपल्या मैत्रिणीजवळ राहण्याचा निर्णय घेतला. 

इश्क सुभान अल्लाह’मध्ये ईशा सिंगचा कमबॅक, जुनीच झारा आता नव्या अवतारात

लॉकडाऊनमध्ये जॅकलिनने फार्महाऊसवर केली मजा

View this post on Instagram

💜 I need a manicure

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

जॅकलिन सलमानच्या फार्महाऊसवर खूपच मजा करत होती. घोडेस्वारी, रोज फार्महाऊसवर फिरणं, सलमानबरोबर त्याच्या वैयक्तिक जिममध्ये व्यायाम  करणं, तिथेच अल्बमचं चित्रीकरण करणं, तसंच तिथेच तिने एका मॅगझिनसाठीही फोटोशूट केले. जॅकलिनने या लॉकडाऊनमध्ये सलमानच्या फार्महाऊसवर खूपच मजा केलेली तिच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही दिसून येत  आहे. मात्र मैत्रिणीसाठी जॅकलिनने तिथून जायचा निर्णय घेतल्याने तिच्या चाहत्यांनाही आता तिचे नक्कीच कौतुक वाटेल. जॅकलिनला नेहमीच तिच्या चाहत्यांनी सळसळत्या उत्साहात पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिची मैत्रीण लवकरच बरी होऊन जॅकलिनच्या हसऱ्या  आणि सळसळत्या  उत्साहाच्या पोस्ट शेअर केलेल्या दिसतील अशी आशा तिचे चाहते करत आहेत. 

स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत येणार छोटे शिवबा!

सलमान आणि जॅकलिनचा अल्बम हिट

लॉकडाऊनच्या काळातच आलेला सलमान आणि जॅकलिनचा अल्बम हिट झाला होता. याचं  संपूर्ण  चित्रीकरणही सलमानच्या फार्महाऊसवरच करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर या अल्बममध्ये पहिल्यांदाच वलुशाच्या मुलीनेही काम केले. संपूर्ण फार्महाऊस स्वच्छ ठेवण्यातही सलमानने स्वतः आणि घरात असणाऱ्या सगळ्यांनीच पुढाकार घेतला होता. त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. दरम्यान या अल्बममध्ये सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री खूपच चांगली जुळून आलेली दिसली. याआधीही  दोघांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असल्यामुळे या दोघांमध्ये खूपच चांगली मैत्री आहे. त्यामुळे जॅकलिन नेहमीच सलमानबरोबर मजामस्ती करताना दिसते. आता लॉकडाऊनचे नियम शिथील झाले असून काही ठिकाणी चित्रीकरणालाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सलमान आणि जॅकलिनदेखील लवकरच कामाला सुरूवात करणार का? याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.