जान्हवी कपूरचा बेली डान्स सोशल मीडियावर व्हायरल

जान्हवी कपूरचा बेली डान्स सोशल मीडियावर व्हायरल

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. धडक चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी जान्हवी सध्या अभिनयासोबतच नृत्यकलेतही प्रंचड मेहनत घेत आहे. जान्हवीचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी बेली डान्सचा सराव करताना दिसत आहे. जान्हवीने जीम आऊटफिटवरच हा बेली डान्स शेअर केला आहे.  या डान्स व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

instagram

जान्हवीने कोणत्या डान्स चॅंलेजसाठी केला बेली डान्स

जान्हवी एका डान्स शोच्या डान्स चॅंलेजसाठी बेली डान्सचा सराव करतेय. टेलीव्हिजन शो ‘डान्स दिवाने’च्या दुसऱ्या पर्वासाठी तिने हा डान्स केला आहे. जान्हवीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी तिला चांगल्या कंमेट्स दिल्या आहेत. डान्स दिवानेच्या सिग्नेचर ट्यून वर जान्हवीने हा डान्स केला आहे. जान्हवीच्या या डान्स मूव्हज पाहून ती तिच्या नृत्यकलेवर फार मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. वास्तविक बेली डान्स करण्यासाठी तुमचे शरीर सुडौल असणं आणि बेली मूव्हज करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. या व्हिडिओमधून जान्हवीचा उत्साह आणि फिटनेस नक्कीच जाणवत आहे. ज्यामुळे चाहत्यांना जान्हवीदेखील डान्समध्ये श्रीदेवीच्या पावलांवर पाऊल टाकेल असं वाटत आहे.

डान्स दिवाने 2 साठी जान्हवी करतेय ही मेहनत

‘डान्स दिवाने’ हा हिंदी  टेलीव्हिजन माध्यमातील एक लोकप्रिय डान्स शो आहे. या शोचं दुसरं पर्व मोठ्या धुमधडाक्यात सुरू होत आहे. या शोचे परिक्षक अभिनेत्री माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि शशांक खेतान असणार आहेत. शो च्या परिक्षकांनी या शोसाठी जान्हवी कपूरला एक डान्स चॅलेंज दिलं होतं. जान्हवीने हे डान्स चॅंलेज स्वीकारत हा बेली डान्स केला आहे.

instagram

जान्हवी फिटनेसवर घेते अशी मेहनत

जान्हवी सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती कधी तिच्या जीम वर्कआऊटवरून घरी जाताना सोशल मीडियावर व्हायरल होते तर कधी तिच्या जीम आऊटफिट्सवरून ट्रोल होते. थोडक्यात ती सतत तिच्या फिटनेसबाबत जागरूक असल्याचं दिसून येतं. आता जान्हवीच्या या डान्स व्हिडिओवरून तिचं फिटनेस आणि नृत्यकौशल्य दोन्हीही कौतुकास्पद असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपट 'रूह अफ्जा'ची तयारी करत आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी असून ती या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यासोबत दिसणार आहे. यासोबतच ती करण जोहरच्या 'तक्त' या अॅक्शनड्रामामध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसंच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येदेखील असणार आहे. थोडक्यात जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने स्टार किड असल्यामुळे तिला पदार्पणातच अनेक चित्रपट मिळाले आहेत. मात्र आता या आगामी चित्रपटांमधून चाहत्यांच्या जान्हवीच्या अभिनयाबाबतच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

अधिक वाचा

IndvsPak: सलमान खानपासून तैमूरपर्यंत पूर्ण बॉलीवूडने साजरा केला भारताचा विजय

लवकरच लग्न करणार बॉलीवूडमधील ‘हे’ 5 सेलिब्रिटी कपल्स

मर्दानी 2’ च्या टीम मेंबर्संनी राणी मुखर्जीला दिलं 'हे' अविस्मरणीय गिफ्ट

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम