बर्थडे गर्ल जान्हवीच्या शालेय जीवनापासून ते बॉलीवूड पदार्पणापर्यंत

बर्थडे गर्ल जान्हवीच्या शालेय जीवनापासून ते बॉलीवूड पदार्पणापर्यंत

दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी कपूरच्या घरी जन्मलेली छोटी परी जान्हवी कपूर.. आज तिचा २२ वा वाढदिवस… धडक चित्रपटातून डेब्यु करणाऱ्या जान्हवीला तिच्या पहिल्याच चित्रपटातून लोकांचे प्रेम मिळाले. चित्रपटाची तुलना मराठीतील सैराटशी झाली. हा सिनेमा फारशी कमाई करु शकला नसला तरी एका सुपरस्टारच्या मुलीने  बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. एक नवा चेहरा इंडस्ट्रीला मिळाला अशी चर्चा होऊ लागली. जान्हवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जान्हवी संदर्भातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत हव्यात.


गुंजन सक्सेना बायोपिकमध्ये दिसणार जान्हवी कपूर


 १. बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आणि चित्रपटनिर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर. तिचा जन्म ६ मार्च १९९७ रोजी मुंबईत झाला.


janhvi sridevi boney२. मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने चित्रपटात काम करण्यासाठी अभिनयाचे धडे घेतले. अॅक्टिंग कोर्स केला.


 


३. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते अगदी खरे होते. कारण जान्हवीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिचे अनेक व्हिडिओ, फोटो तिने स्वत:ही शेअर केलेले आहेत. त्यात तिच्या नटखट अदा पाहायला मिळत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Hbd to my only constant 💕 I hope we keep fighting about bs forever


A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on


४.श्री देवीचा ‘सदमा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तिला आईचा खूप राग आला होता. शिवाय आईच्या अभिनयाने ती  भावविवश होऊन गेली होती.


५. सैराट हा नागराज मंजुळे यांचा चित्रपट हिंदी करायचा ठरल्यानंतर या चित्रपटाची जबाबदारी करण जोहरने घेतली. यात  फ्रेश जोडीच्या रुपात जान्हवी आणि ईशान खट्टर पाहायला मिळाली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने कंबर कसली ती अनेक ठिकाणी दिसून आली.


dhadak
६. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच श्रीदेवी  यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर भांबावलेली जान्हवी सावरली आणि पुन्हा कामाला लागली.


७. धडक चित्रपटाआधी जान्हवीला साऊथ चित्रपटातूनही काही ऑफर्स आलेल्या होत्या. पण त्या तिने स्विकारल्या नाहीत.


८. जान्हवीच्या  फिल्म डेब्युआधी तिच्या प्लॅस्टिक सर्जरीदेखील तितक्याच गाजल्या. श्रीदेवीप्रमाणे जान्हवीने अनेक सर्जरी करत आपल्या सौंदर्यात वाढ केली आहे.


९. जान्हवी कपूरचे अफेअर्सही चर्चेचा विषय राहिले आहेत. सध्या ती धडकचा को स्टार इशान खट्टरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्या आधी ती गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारियासोबत रिलेशनशीपमध्ये होती. त्याला किस करतानाचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर त्या दोघांचे ब्रेकअप झाले. याबाबात आणखी सांगायचे झाले तर सारा अली खान सुद्धा याच मुलाला काहीकाळ डेट करत होती.


janhavi ishaan१०. नव्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या जान्हवीची सारासोबत नेहमीच तुलना केली जाते. अभिनयाबाबत दोघींच्या जमेच्या बाजू असतानाही दोघांचीही कायम तुलना केली जाते. त्यामुळे सध्या तरी जान्हवीला सारा अली खान ही स्पर्धक असल्याचे कळते.


११. जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय तिने महिला फायटर पायलट गुंजन सक्सेनाच्या शुटींगलाही सुरुवात केल्याचे कळत आहे. या शिवाय राजकुमार रावसोबत ती एका हॉरर कॉमेडीपटात दिसणार आहे. तिने राजकुमारसोबतचा चित्रपट साईन केल्याचे देखील कळत आहे.


(फोटो सौजन्य-Instagram)