गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन

गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन

जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. पहिली महिला फायटर प्लेन पायलेट गुंजन सक्सेनच्या जीवनावर आधारीत चित्रपटात जान्हवी गुंजनची भूमिका साकारणार आहे. पहिली महिला फायटरची भूमिका साकारणे हे  सोपे नाही म्हणूनच जान्हवी यासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. पण आता जान्हवी समोर आणखी एक पेच उभा राहणार आहे तो म्हणजे वजन वाढवण्याचा… कारण आतापर्यंत आपण जान्हवीला तिच्या सुंदर सुडौल बांध्यासाठी ओळखतो. तिच्या या सेक्सी हॉट फिगर मागे ती जीममध्ये जाऊन मेहनतही घेताना दिसते. पण आता तिला या नव्या सिनेमातील चॅलेंजिग रोलसाठी वजन वाढवावे लागणार आहे. आता वजन वाढल्यानंतर जान्हवी कशी दिसेल? हे थोड्या दिवसांनी कळेल.


जान्हवी वाढवाणार ७ किलो वजन


वाढलेले वजन कमी करता करता नाकी नऊ येते. पण जान्हवीला मात्र गुंजन सक्सेनाचा रोल साकारण्यासाठी तब्बल ७ किलो वजन वाढवावे लागणार आहे.  महिला फायटर पायलटकडे असणारी ताकद आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी हे गूण असतात अशावेळी त्यांना नाजूक दाखवणे योग्य ठरणार नाही आणि भूमिकेला न्यायही मिळणार नाही. म्हणूनच जान्हवीचे वजन वाढवण्यात येणार आहे.या आधी जेव्हा ती धडकमध्ये इशान खट्टरसोबत दिसली होती. त्यावेळी ती जीममध्ये अधिक मेहनत करताना दिसत होती. पण आता वजन वाढवायचे म्हटल्यावर  जान्हवीला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. आता वजन वाढवल्यानंतर जान्हवीच्या सौंदर्यात भर पडते की नाही हे प्रेक्षक ठरवतील.


janhvi kapoor1


पाहा नोराचा हॉट, सिझलींग डान्स


कोण आहे गुंजन सक्सेना?


१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी युद्धात सहभागी होत महत्वाची भूमिका निभावली होती. गुंजन सक्सेना यांच्या अतुलनीय कामगिरीची आठवण कारगिल युद्धावेळी नेहमीच घेतली जाते. त्यामुळेच या महिला पायलटच्या कामगिरीची अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट तयार केला जात आहे. या आधीदेखील नीरजा भनौत या एअर होस्टेसच्या शौर्याची कथा सांगणारा नीरजा हा चित्रपट येऊन गेला. यात सोनम कपूरने नीरजाची भूमिका साकारली होती. 


सारा आणि कार्तिक फायनली करणार या सिनेमातून रोमान्स


‘तख्त’साठी उत्सुक


'धडक'मधून डेब्यु केल्यानंतर जान्हवी कपूरच्या अभिनयावर अनेकांनी टीका केली. पण सध्या जान्हवी कपूरच्या हातात दोन मोठे चित्रपट आहे. काहीच दिवसांपूर्वी जेव्हा ती निळा डगला घालून दिसली त्यावेळी ती गुंजन सक्सेनाच्या जीवनावर आधारीत सिनेमा करत आहे यावर मोहर बसली. शिवाय बायोपिकच्या शुटींगनंतर लगेचच ती करण जोहरच्या तख्त या चित्रपटाच्या शुटींगमध्ये ती व्यग्र होणार आहे. त्यामुळे दोन मोठे सिनेमे आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यासाठी तिच्याकडे दमदार चित्रपट आहेत असे म्हणायला हवे.


janhvi-kapoor2


रविकिशनची मुलगीही करतेय बॉलीवूडमध्ये डेब्यु


खुशी करणार डेब्यु?


सध्या बी टाऊनमध्ये कपूर बहिणींचा मोठाच बोलबाला आहे. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या नेहमीच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीची लहान बहीण खुशी हिच्या सौंदर्यावरही नेटीझन्स फिदा आहेत. तर खुशीच्या फॅन्ससाठी ही बातमी खास असणार आहे. कारण त्यांना लवकरच खुशी चित्रपटात दिसणार आहे. आता खुशी कोणत्या चित्रपटातून डेब्यु करतेय त्यासाठी थोडा वेळ थांबावे लागणार आहे.


khushi kapoor


 (फोटो सौजन्य- Instagram)