सप्तरंगी स्विमसूटमधल्या जान्हवीच्या अदा, मालदिव्ज वेकेशनचे फोटो व्हायरल

सप्तरंगी स्विमसूटमधल्या जान्हवीच्या अदा, मालदिव्ज वेकेशनचे फोटो व्हायरल

जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असताना बॉलीवूड सेलिब्रेटीज मात्र वेकेशनचा आनंद लुटत आहेत. सेलिब्रेटीजसाठी सध्या हॉट वेकेशन डेस्टिनेशन आहे मालदिव्ज. ज्यामुळे एका पाठोपाठ एक असे अनेक बॉलीवूड सेलिब्रेटीज सध्या मालदिव्जमध्ये फिरण्यासाठी जाताना दिसतात. कोरोनाचा काळ असूनही  मागील काही महिन्यात महिन्यात सोनाक्षी सिन्हा, दिशा पाटनी, तापसी पन्नू, टायगर श्रॉफ, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, हिना खान, श्रद्धा कपूर, अनन्या पांडे यांनी मालदिव्जमध्ये हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षितही तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत मालदिव्ज वेकेशनवर गेली होती. आता या लिस्टमध्ये जान्हवी कपूरची भर पडली आहे. कारण जान्हवी सध्या मालदिव्जमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. लॉस एंजिलसमधील ट्रिप संपवून जान्हवी थेट मालदिव्ज वेकेशनवर गेली आहे. सध्या ती तिचे मालदिव्जमधील हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. ज्यामुळे मालदिव्जमधील जान्हवीचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

जान्हवीचा हा सिजलिंग लुक तुम्ही पाहिला का -

जान्हवीने तिचे मालदिव्ज वेकेशनवरील  अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मात्र यातील तिचा सप्तरंगी रंगाच्या मॅटेनिक मोनोकिनीतला लुक चाहत्यांना सर्वात जास्त आवडला आहे. नेहमी सिंपल लुकमध्ये दिसणाऱ्या जान्हवीचा हा वेकेशन मूड पाहून चाहते थक्क झाले आहे. ज्यामुळे त्यांनी तिच्या या फोटोजवर लाईक्स आणि कंमेटसा पाऊसच पाडला आहे. सुर्याच्या किरणांसोबत मिक्स मॅच होणारा  तिचा हा सप्तरंगी स्मिमसूट खूपच हटके दिसत आहे. या फोटोसोबत तिने शेअर केलं आहे की, इरिडिसेंट आणि इंद्रधनुष्याची इमोजी. याचाच अर्थ की तिचा स्विमसूट  इंद्रधनुष्याच्या सात रंगाप्रमाणे रंगीबेरंगी आहे. जान्हवी मालदिव्जला जाण्यापूर्वी तिची बहीण खुशीला भेटण्यासाठी न्युयॉर्कला गेली होती. कारण खुशी सध्या न्युयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचे शिक्षण घेत आहे. दोघी बहिणींमध्ये खूपच चांगले बॉडिंग आहे. त्यामुळे जान्हवी अधूनमधून खुशीला भेटण्यासाठी जात असते. 

जान्हवीचे आगामी चित्रपट -

जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर एका मागोमाग एक चित्रपटांचा धडाकाच लावला आहे. मागच्या महिन्यातच तिचा 'रुही' सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तिच्या करिअरमधील हा दुसरा चित्रपट जो कोरोनाच्या काळात थेट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. कारण त्याआधी तिच्या नेटफ्लिक्सवरील 'गुंजन सस्केना'लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिच्या 'घोस्ट स्टोरीज'वरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. रूही  एक हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. ज्यात जान्हवीने भूताची भूमिका साकरली आहे. या भूमिकेसाठी जान्हवीला तासनतास मेकअप करावा लागत होता. तिच्या या लुकचे  आणि या चित्रपटातील डान्सचे, अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरूण शर्मा होते. ज्यामुळे या चित्रपटाला एक छान कॉमेडी  स्वरूप प्राप्त झाले. जान्हवी लवकरच 'गुडलक' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या व्यतिरिक्त जान्हवी अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटांची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.