बॉलीवूडमध्ये दरवर्षी कोणी ना कोणी स्टारकिड्स डेब्यू करतच असतात. या लिस्टमध्ये आता अजून एक नाव सामील होण्याची शक्यता आहे. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नंतर आता छोटी बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) ही बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. जान्हवीने बॉलीवूडमध्ये अजून बऱ्यापैकी जमही बसवला नाही. तोच आता खुशी कपूर बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याबाबतची चर्चा सूरू आहे.
अजून कपूर कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण खुद्द जान्हवीने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केल्याचं कळतंय. या मुलाखतीत तिने सांगितलं की, खुशीला बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम करण्यात रस आहे.
चॅट शोमध्ये जान्हवीचं वक्तव्य
एक चॅट शोमध्ये जान्हवीने सांगितलं की, खुशी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. पण त्याआधी ती न्यूयॉर्क येथील अकॅडमीमध्ये जाऊन अॅक्टींग कोर्स करणार आहे. हा कोर्स झाल्यानंतरच ती ठरवेल की, तिला पुढे काय करायचं आहे.
आपली आई अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवीने 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ (Dhadak) चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं. या चित्रपटात जान्हवीसोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यांची जोडी दिसली होती. यानंतर आता जान्हवी तीन आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
जान्हवीच्या शालेय जीवनापासून ते बॉलीवूड पदार्पणापर्यंतचा प्रवास
पहिला चित्रपट असेल करण जोहर निर्मित तख्त. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे.
गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन
तर दुसरा चित्रपट आहे गुंजन सक्सेनावरील बायोपिक ‘कारगिल गर्ल’ आणि तिसऱ्या चित्रपटाचं नाव आहे ‘रूह अफ्जा’. या चित्रपटात तिच्यासोबत लीड रोलमध्ये आहे राजकुमार राव. हा चित्रपट कॉमेडी हॉरर चित्रपट असणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार आहे.