OMG अर्जुन रेड्डी स्टार Vijay Deverakonada सोबत झळकणार Janhvi Kapoor

OMG अर्जुन रेड्डी स्टार Vijay Deverakonada सोबत झळकणार Janhvi Kapoor

पूर्वी बॉलीवूडमध्ये डाळ न शिजल्यावर अभिनेत्री दाक्षिणात्य म्हणजेच साऊथ चित्रपटांची वाट धरायच्या किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चमकल्यावर मग बॉलीवूडची वाट धरायच्या. पण आता तसं काही राहिलं नाही. आजकालचे बॉलीवूड सेलेब्स इतर भाषांमध्येही काम करतात, बॉलीवूडमध्येही काम करतात एवढंच नाहीतर वेबसीरिजमध्ये झळकतात. आता याच वाटेवर बॉलीवूडच्या यंग ब्रिगेडमधील जान्हवीही चालताना दिसतेय.

जान्हवीचा साऊथ डेब्यू लवकरच

View this post on Instagram

Peaches and cream 🍦

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

सूत्रानुसार, श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच साऊथ चित्रपटात डेब्यू करणार आहे. बातमी आहे की, तिने पहिल्या साऊथ चित्रपटाला होकार दिला आहे. या बातमीनुसार ती अर्जुन रेड्डी स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोबतच्या चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे. वाह क्या नसीब है...पहिला साऊथ सिनेमा आणि तोही विजय देवरकोंडासोबत. पण सूत्रानुसार जान्हवीने या आधी तिच्याकडून साऊथमधील सुपरस्टार अजितबरोबर काम करण्यासही होकार दिला होता. मात्र माशी कुठे शिंकली माहीत नाही.

जान्हवी आणि विजयची जोडी

सूत्रानुसार, या नाव न घोषित केलेल्या चित्रपटाचं नाव थाला 60 (Thala) असू शकतं. या चित्रपटामध्ये जान्हवी विजयच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल. असंही कळतंय की, या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी धडक स्टार जान्हवी कपूरला नुकतंच अप्रोच केलं होतं. यानंतर जान्हवीने या प्रोजेक्टसाठी होकार दिला आहे. या चित्रपटाच्या तयारीला जान्हवीने आपल्या आईप्रमाणेच पहिलं प्राधान्य दिल्याचं कळतंय. म्हणजेच आईप्रमाणेच आता जान्हवीही साऊथमध्ये आपल्या अभिनयाची कमाल दाखवणार.

View this post on Instagram

😊

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda) on

हा सिनेमा काही महिन्यातच फ्लोरवर जाणार आहे. पण या चित्रपटाबाबत अजून कोणतीही अधिकारिक घोषणा करण्यात आलेली नाही. आता हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे की, विजय देवरकोंडा आणि जान्हवीची जोडी ऑनस्क्रीन कशी दिसते.

जान्हवीचं स्वप्न होणार पूर्ण

कबीर सिंग रिलीज झाल्यावर अनेकांनी हिंदी व्हर्जन पाहण्याआधी ओरिजिनल चित्रपट पाहिला. त्यामुळे बहुतेक जण विजय देवरकोंडाच्या प्रेमात पडले. याला जान्हवीही अपवाद नाही. खऱ्या आयुष्यात जान्हवीसुद्धा विजय देवरकोंडाची फॅन आहे. कारण या आधी एका मीडिया इंटरव्ह्यूमध्ये जान्हवीने विजय देवरकोंडावर तिचा क्रश असल्याचं बिनधास्त सांगितलं होतं. त्यामुळे आता हा चित्रपट खरंच फ्लोरवर गेल्यावर जान्हवीचं तिच्या क्रशसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होईल.

जान्हवीच्या करिअरची घौडदौड

View this post on Instagram

Missing this hurrr 💇🏻‍♀️🥺

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीचा पहिला चित्रपट धडक बॉक्स ऑफिसवर साफ आपटला तरी तिच्याकडे सध्या प्रोजेक्टसची कमी नाहीयं. सध्या जान्हवी राजकुमार रावसोबतच्या रूही आफ्जा या चित्रपटांमध्ये बिझी आहे. याशिवाय तिच्याकडे गुंजन सक्सेना बायोपिक, मल्टीस्टारर तख्त आणि कार्तिक आर्यनसोबतचा दोस्ताना 2 सारखे प्रोजेक्ट आहेत. तसंच ती झोया अख्तरच्या शॉर्टफिल्म घोस्ट स्टोरीजमध्येही दिसणार आहे. त्यातच विजय देवरकोंडासोबतच्या चित्रपटाच्या बातमीने बॉलीवूडमध्ये तिच्या साऊथ डेब्यूचीही चर्चा रंगू लागली आहे. आता पाहूया खरंच हा चित्रपट जान्हवीला मिळतो की नाही ते.