सुरज पांचोलीवर होणाऱ्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली त्याची आई

सुरज पांचोलीवर होणाऱ्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली त्याची आई

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणापासून सातत्याने एका अभिनेत्याचे नाव पुढे येत आहे ते म्हणजे आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली. अभिनयात त्याने फारशी चुणूक दाखवली नसली तरी अनेक कॉन्ट्राव्हर्सीजमध्ये आदित्य आणि सुरजचे नाव कायम असते. जिया खान प्रकरण मागे पडल्यानंतर आता 2020 मध्ये सेलिब्रिटी PA दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणीही सुरज पांचोलीच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. सुरजचे या सगळ्याशी कनेक्शन असल्याच्या सतत बातम्या येत आहेत.या बातम्यांवर अखेर त्याच्या आईने मौन सोडले आहे. त्याची आई मुलाच्या बाजूने उभी राहिली आहे. सुरजवर होणाऱ्या सगळ्या आरोपांचे तिने खंडन केले आहे.

मुंबईतच संजय दत्त घेणार कॅन्सरवर उपचार

काय म्हणाली जरीना वहाब

Instagram

सुरजची आई म्हणजेच अभिनेत्री जरीना वहाब हिने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात दिशा सालियनच्या मृत्यूबाबत विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, माझा मुलगा पंचिंग बॅगप्रमाणे झाला आहे. जो कोणी येतं त्याच्यावर आरोप करुन निघून जातं. त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्याचे नाव सतत गोवले जात आहे. दिशा सालियानच्या मृत्यूशी त्याचा काहीही संबंध नाही. सुरजच्या नावाचा अनेकदा अशा काही गोष्टी झाल्या की, संबंध लावला जातो. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट केल्या जातात, असे देखील तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले. 

त्या फोटोमुळे सुरजवर आले नाव

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. या दोघांनी आत्महत्या केली यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. सुशांत सिंह राजपूतची PA अशी ओळख असलेल्या दिशासोबत सुरजचे संबंध दाखवणारा एक फोटो वायरल होत होता. यामध्ये दिशा आणि सुरज एकत्र दिसत होते. पण हा फोटो फेक असल्याचे सुरज पांचोली याने सांगितले. मी दिशाला ओळखत नाही. तिची माझी भेट कधीही झाली नाही. त्यामुळे याचा माझ्याशी काही संबंध नसल्याचे त्याने सांगितले होते. यावरुनही त्याला अनेकांनी ट्रोल केले होते. 

बाहुबली आता बनणार आदिपुरुष, केली ग्रँड घोषणा

सुरज पांचोली होतोय सातत्याने लक्ष्य

दिशा आणि सुशांत या प्रकरणात अनेक बड्या कलाकारांची नावे पुढे आली आहेत.त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे. पण या आधीही बॉलिवूडमधील एका आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का दिला होता ती अभिनेत्री म्हणजे जिया खान. चित्रपटांमध्ये येण्याआधी सुरज पांचोलीचे अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या जिया खानसोबत संबंध होते. अचानक जिया खानच्या आत्महत्येची बातमी समोर आली. तिने अचानक घरात आत्महत्या का केली हे अनेकांना कळले नाही. तिच्या आत्महत्येसंदर्भात तिने काहीही लिहून ठेवले नव्हते. पण तिच्या मेडिकल रिपोर्टनुसार ती आई होणार असल्याचे कळले होते. सुरज आणि तिच्यामधील असलेले संबंध बिघडले होते. ही मारहाण आणि तिला मारण्याचे काम सुरज पांचोलीने केलेत असा दावा जिया खानच्या आईने केला होता. तिने काही वर्ष सातत्याने यासाठी लढा दिला. पण तिच्या मृत्यूचे कोडे काही केल्या उलगडले नाही. त्याही प्रकरणात सुरजचे नाव होते. इतकेच नाही. आदित्य पांचोलीही अनेकदा चर्चेत असतो. सलमान खानशी त्याच्या कुटुंबियांचे चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पांचोली कुटुंबाबाबत बराच रोष अनेकांमध्ये आहे. 


आता दिशा सालियनच्या प्रकरणाशी सुरज पांचोलीचा खराच संबंध आहे की नाही, त्याचे नाव उगाच याममध्ये गोवले जात आहे. ते पुढील तपासच सांगू शकेल.

एक महिन्यातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने केले ब्रेकअप, कारण जाणून वाटेल आश्चर्य