जय आणि माहीच्या घरी येणार नवा पाहुणा

जय आणि माहीच्या घरी येणार नवा पाहुणा

हिंदी टेलीव्हिजन माध्यमातील सेलिब्रेटी कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. माही विज प्रेग्नंट असून लवकरच या कपलच्या घरी त्यांचं पहिलं बाळ येणार आहे. माही विज चार महिन्यांची गरोदर असल्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर कमी अॅक्टिव्ह आहे. जय आणि माहीच्या घरी अनेक वर्षांनी ही आनंदाची बातमी आली असल्याने ते दोघंही खूपच खूश आहेत.

जय आणि माही एक चांगले पालक


जय आणि माही 2010 साली विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी त्यांचं स्वतःचं बाळ होणार आहे. मात्र स्वतःचं बाळ होण्यापूर्वीच ते चांगले पालक असल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. जय आणि माहीने या आधीच  दोन मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. त्यांच्या घरी काम करण्याऱ्या मदतनीसांच्या दोन मुलांचा संपूर्ण खर्च जय आणि माही करतात. थोडक्यात एक मुलगी आणि एक मुलगा त्या दोघांनी आधीच दत्तक घेतले आहेत. वास्तविक ही मुलं त्यांच्या खऱ्या आई-वडीलांसोबतच राहतात मात्र त्यांना चांगलं शिक्षण, आरोग्य आणि आयुष्य मिळावं यासाठी जय आणि माही प्रयत्न करतात. याशिवाय या दोन्ही मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी ते  दोघं खास वेळ काढतात. अनेकवेळा जय आणि माही यांच्यासोबत ही दोन मुलं दिसून येतात. ते या दोन्ही मुलांची अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. एवढंच नाही तर या मुलांना जय आणि माहीने इतका लळा लावला आहे की ती मुलं या दोघांना मम्मी आणि पप्पा या नावाने हाक मारतात. लग्नाच्या आधी माहीच्या घरी केअरटेकरचं काम करणाऱ्या मदतनीसाची ही दोन मुलं आहेत. लग्नानंतर माही त्या केअरटेकरला तिच्या घरी घेऊन आली. आणि आता जय आणि माही त्याच्या मुलांना स्वतःच्या मुलांनप्रमाणे सांभाळतात.

जय आणि माही लवकरच होणार आई-बाबा


सहाजिकच जय आणि  माही जर त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलांची एवढी काळजी घेत असतील तर ते त्यांच्या स्वतःच्या मुलाचे देखील नक्कीच चांगले पालक होतील. त्यांच्या घरी अनेक वर्षांनी ही गोड बातमी आली आहे. त्यामुळे जय आणि माहीच्या या नव्या प्रवासासाठी मनपुर्वक शुभेच्छा.


ग्रँड मस्ती’ करणारी अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केला फोटो


राखी तू अॅवॉर्ड विकत घेतलास का, दादासाहेब पुरस्कारानंतर राखी झाली ट्रोल


फोटो काढण्याआधी मेकअप तरी करायचा,सल्ला देणाऱ्याला नम्रताने दिले उत्तर


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम