अभिनेता जय भानुशालीला हवी आहे मुलगी, लवकरच होणार बाबा

अभिनेता जय भानुशालीला हवी आहे मुलगी, लवकरच होणार बाबा

सध्या बॉलीवूड इंडस्ट्री असो वा टीव्ही इंडस्ट्री बऱ्याच ठिकाणी good news ऐकू येत आहेत. लवकरच टीव्हीवरील उत्तम निवेदक म्हणून ओळखला जाणाऱ्यांपैकी एक जय भानुशाली बाबा होणार असून त्याची पत्नी माही विज एका बाळाला जन्म देणार आहे. काही महिन्यांपूर्वीच जय आणि माहीने आपण आाई वडील होणार असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. तर आता आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छाही त्याने बोलून दाखवली आहे. जय आणि माही सध्या खूपच आनंदी आहेत. 

Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’

मुलगी असावी अशी इच्छा

जयने एका मुलाखतीमध्ये आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मुलगा असो वा मुलगी त्याने काही फरक पडत नाही. पण तरीही मुलगी झाली तर आपल्याला जास्त आवडेल असं जयने सांगितलं आहे.  वडील आणि मुलीसारखं नातं या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. हे नातं मनाला समाधान मिळवून देतं. त्यामुळे माझ्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म द्यावा असं जयने म्हटलं आहे. आजच्या परिस्थितीत मुलगी मुलापेक्षा नक्कीच कमी नाही. माझी पत्नी माही आजही तिच्या आई वडिलांची व्यवस्थित काळजी घेते, जशी ती लग्नापूर्वी घेत होती. तसंच पुढे जयने असंही सांगितलं आहे की, मी माझ्या वडिलांबरोबर माझं नातं पाहिलं आहे, त्यामुळे मुलगा झाला तर मला वाईट वाटेल असं नाही. पण मुलीबरोबरच्या नात्याचाही मला अनुभव घ्यायचा आहे असं त्याने म्हटलं आहे. 

Good news: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा

दोन मुलांना घेतलं आहे दत्तक

जयने गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या दोन मुलांना दत्तक घेतलं असून त्यापैकी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. जय आणि माही हे दोघंही नेहमीच या दोघांची काळजी घेताना दिसून आले आहेत. आता त्यांनाही बाळ होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मुलांचं संगोपन करत आपल्या बाळाची काळजीही दोघे घेणार आहेत. ही गोष्ट जयने कोणालाही सांगितलं नव्हती. पण एका रियालिटी शो वर त्या दोन्ही मुलांना बोलावण्यात आलं होतं तेव्हा जयने स्वीकारलेली ही जबाबदारी समोर आली. 

Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर

अनोख्या पद्धतीने केलं होतं शेअर

जय आणि माहीने अनोख्या पद्धतीने आपण आई वडील होणार असल्याचं शेअर केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. जय आणि माहीच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत. गेल्या वर्षी एका मुलाखतीत आता माहीने आपल्याला वडील होण्याचा आनंद मिळवून द्यावा असं जयने बोलून दाखवलं होतं. माहीदेखील अभिनेत्री असून सध्या ती जयबरोबर संसारात व्यग्र झाली आहे. तिनेही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर जयने मालिका, चित्रपट आणि रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. सध्या जय एका सिंगिंग रियालिटी शो चा निवेदक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. हा शो लहान मुलांचा असून त्याची त्याचं त्यांना हाताळण्याचा कसब नेहमीच दिसून येतं. जयने याआधीदेखील डान्स शो केले असून लहान मुलांबरोबर डील केलं आहे. जय लहान मुलांबरोबर अगदी त्यांच्यासारखा होऊन जातो. त्यामुळे त्याच्या बाळाचा तो एक चांगला पिता बनेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.