‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज, कंगना रणौत सोशल मीडियावर ट्रोल

‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज, कंगना रणौत सोशल मीडियावर ट्रोल

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौतचा बहुप्रतीक्षित-बहुचर्चित सिनेमा ‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित सिनेमात कंगना प्रमुख भूमिकेत आहे. पोस्टर पाहून कंगनाला ओळखणं खरंच कठीण आहे. कारण कंगनानं भूमिकेसाठी आश्चर्यकारक असा कायापालट केलाय.  मोठ्या पडद्यावर जयललिता यांच्या प्रमाणेच हुबेहुब दिसण्यासाठी कंगनानं प्रचंड मेहनत घेतल्याचं याद्वारे दिसत आहे. पोस्टरमध्ये कंगना रणौत जयललितांच्या अंदाजात विक्ट्री साइन दाखवताना दिसत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच कंगना चर्चेत होती. आता सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर आणि व्हिडीओ रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा बायोपिक हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे.  तामिळमध्ये सिनेमाचं नाव ‘थलायवी’ आणि हिंदीमध्ये ‘जया’ असं ठेवण्यात आलं आहे. 26 जून 2020 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए.एल विजय यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

(वाचा : ‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…)

कंगनानं घेतलं कोट्यवधींचं मानधन

जयललितांच्या बायोपिकमध्ये कंगना एवढी गुंतली होती की तिनं मनालीतील आपल्या राहत्या घराचं डान्स स्टुडिओमध्ये रुपांतर केलं होतं. जयललिता यांचा सिनेसृष्टी, राजकारण ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास बॉक्सऑफिसवर पाहायला मिळणार आहे. विशेष प्रशिक्षण ते प्रोस्थेटिक मेकअप… जयललितांसारखं दिसण्यासाठी कंगनानं मेहनत घेण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. दरम्यान,सिनेमासाठी कंगनानं तब्बल 20 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा : आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लूक रिलीज)

 

अशी घेतली कंगनानं मेहनत

काही दिवसांपूर्वी कंगनानं प्रोस्थेटिक (Prosthetic) मेकअप संदर्भातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला होता. ज्यात तिच्या चेहऱ्यावर निळ्या-हिरव्या रंगाचा विशिष्ट प्रकारचा मास्क लावल्याचं दिसतआहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लॉस एंजेलिसमधील जेसन कॉलिन्सच्या स्टुडिओ असल्याची माहितीदेखील दिली होती. 

(वाचा : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साकारणार ‘ही’ मोठी ऐतिहासिक भूमिका)

 

कंगनानं सोशल मीडियावर ट्रोल

दरम्यान,थलायवीचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काही जणांनी कंगनाला प्रचंड ट्रोलदेखील केलं आहे. एका युजरनं म्हटलं की, अॅनिमेशन अतिशय वाईट केलं आहे.   तर एकानं लिहिलंय की, ‘अम्मासाठी अतिशय दुःख होत आहे. हा त्यांचा अपमान आहे’. एकीकडे लुकवरून कंगनावर टीका केली जात असतानाच दुसरीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. थलायवी सिनेमासाठी कंगना परफेक्ट असून भूमिकेसाठी तिनं केलेला कायापालट अप्रतिम असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. जयललितांच्या बायोपिकनिमित्तानं कंगनाची जादू बॉक्सऑफिसवर पाहायला मिळणार का? हे पाहण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहावी लागेल. गेल्या वर्षांमध्ये कंगनानं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यावर्षी रिलीज  झालेला तिचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमालाही सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

बॉलिवूडची क्वीन कंगना

बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत कंगनाच्या नावाचा समावेश आहे. 2006 मध्ये रिलीज झालेल्या गँगस्टर सिनेमातून कंगनान या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. यानंतर वो लम्ह हे, लाइफ इन मेट्रो, फॅशन,  तनू वेड्स मनू, फॅशन, तनू वेड्स मनू रीटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका, जजमेंटल यांसारखे सिनेमा बॉलिवूडला दिले. 2014मध्ये आलेल्या क्वीन सिनेमातील दमदार अभिनयामुळे कंगनाला खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या झोतात आली. कंगना राणौतला आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात  आलं आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.