जयडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला, यावेळी मात्र होणार राजकन्या

जयडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला, यावेळी मात्र होणार राजकन्या

जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारणारी किरण आता डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. किरणने साकारलेली जयडी ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आजही ती या भूमिकेसाठीच ओळखली जाते. पण आता किरण एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असून या भूमिकेतदेखील प्रेक्षक आपल्याला स्वीकारलीत असा विश्वास किरणला वाटत आहे.


काय आहे नवी भूमिका?


ek hoti rajkanya FI


या लाँच झालेल्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसं आयुष्य जगेल याचं कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात. मात्र त्याच्या अगदी विरूद्ध या राजकन्येचं खरं आयुष्य आहे. काही कारणास्तव अवघडलेलं आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपलं आयुष्य जगणारी ही राजकन्या. नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात आपलं स्थान निर्माण करणारी जयडी म्हणजेच अभिनेत्री किरण ढाणे या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवि सौमित्र यांनी साकारली आहे. उत्कृष्ट अभिनेत्यांची ही अदाकारी लवकरच सोनी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा किशोर कदमचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. किशोर कदम यांनी आपल्या कवितांनी जितकं प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे तितकाच त्यांचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावणारा आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा लहान पडद्यावर साकारलेला या राजकन्येचा बाबा म्हणून प्रेक्षकांसमोर किशोर कदम येत आहे. यापूर्वीदेखील किशोर कदम यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. शिवाय या मालिकेमध्ये आता किशोर कदम आणि किरण ढाणेच्या अभिनयाची जुगलबंदी सर्वच प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि ही जोडी नक्कीच बाप - लेक म्हणून वेगळी असेल याचा प्रेक्षकांना नक्कीच या प्रोमोमधून अंदाज आला असेल. प्रोमो अतिशय प्रॉमिसिंग वाटत असून या राजकन्येला कोणकोणत्या अडचणीला सामोरं जावं लागणार आणि त्यातून ती कसा मार्ग काढणार हे लवकरच कळेल. 


जयडीपेक्षा राजकन्या वेगळी


45804412 2015035275211377 1556147951835628275 n


बरेचवेळा एका भूमिकेमुळे त्याच तऱ्हेच्या भूमिका विचारल्या जातात. किरण ढाणेबरोबरही असंच घडलं पण  याबाबत किरण ढाणेला विचारले असता, 'यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. 'एक होती राजकन्या'च्या निमित्तानं, एका खंबीर मुलीची भूमिका मला साकारायला मिळतेय. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा असल्याचं, तिने स्पष्ट केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयडी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतानाच किरणने काही अंतर्गत कारणामुळे ही मालिका सोडली होती आणि त्यानंतर तिला त्याच साच्यातील भूमिकेमुळे अडकून राहायचं नव्हतं. त्या नकारात्मक भूमिकेतून बाहेर येत आता अवनीची व्यक्तिरेखा किरण कशी साकारणार याची नक्कीच चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली असेल. त्यामुळे अवनी आता मराठी प्रेक्षकांनी किती भावणार हे लवकरच कळेल.


हेदेखील वाचा - 


रोहित शेट्टीच्या कुटुंबामध्ये झालं नव्या पाहुण्याचं


पालक आणि मुलांमधील हरवत चाललेल्या नात्याला हवी 'सुसंवादाची गरज'


जेवण जेवताच बिघडली सोनू निगमची तब्येत आणि आवाज झाला बंद