जेनिफर विगेंटचा खुलासा, करण सिंह ग्रोव्हर सोबत का तोडलं नातं

जेनिफर विगेंटचा खुलासा, करण सिंह ग्रोव्हर सोबत का तोडलं नातं

जेनिफर विंगेट हिंदी टेलीव्हिजन माध्यमातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. वयाच्या बाराव्या वर्षी तिने तिच्या अभिनय करिअरला सुरूवात केली. कसौटी जिंदगी की, दिल मिल गए, सरस्वतीचंद्र अशा अनेक हिंदी मालिकांमधून तिने काम केलं आहे. मात्र तिचा बेहद मधील तिचा अंदाज फारच वेगळा होता. तिच्या बेहद मधील माया या पात्रावर अनेकजण फिदा झाले होते. बेपनाह मालिकेत हर्षद चोप्रासोबत तिची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती. शिवाय सोशल मीडियावरही जेनिफरचे अनेक चाहते आहेत. प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी ठरलेल्या जेनिफरने मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळे पार केले आहेत. नुकताच जेनिफरने तिच्या खाजगी आयुष्याबाबत एक नवा खुलासा केला आहे. ज्याचा सबंध तिच्या पूर्वाश्रमीच्या पती करण सिंग ग्रोव्हरशी निगडीत आहे. 


Jennifer1


जेनिफर आणि करण होते एकेकाळचे 'बेस्ट कपल'


जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हर लोकप्रिय हिंदी मालिका ‘दिल मिल गए’ मध्ये काम करता करता एकमेंकांच्या जवळ आले. काही वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. जेनिफर आणि करणची जोडी टेलीव्हिजन माध्यमातील एक हिट जोडी होती. टेलीव्हिजनच्या अनेक कार्यक्रमात ही जोडी एकत्र दिसत होती. अनेकांना त्यांची जोडी आवडत असल्यामुळे त्यांच्या एकत्र काम करत असलेल्या मालिकांना चांगली पसंती मिळत होती. मात्र लग्नानंतंर दोनच वर्षांमध्ये जेनिफर आणि करण एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर त्या दोघांनी कधीच त्यांच्या घटस्फोटाचा मीडियासमोर खुलासा केला नाही. मात्र आता अचानक घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर आणि आपापल्या जीवनात पुढे गेल्यावर अभिनेत्री जेनिफरने करणसोबत वेगळे होण्याचे कारण उघड केले आहे. 


Jennifer 2


जेनिफर आणि करणचे नाते का लुटले


जेनिफरच्या मते, “लग्न  हे एक सुंदर नातं असतं. जेव्हा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदतात तेव्हा हे नातं आणखी बहरतं. मात्र कधी कधी माणसांच्या जीवनात काही चुका घडतात. आपल्या चुकांचे परिणाम आपल्या जोडीदाराला भोगावे लागतात हे नक्कीच योग्य नाही. करणसोबत असलेल्या नात्याविषयी माझ्या मनात कोणत्याही कडू आठवणी नाहीत. उलट मी करणची आभारी आहे की त्याने योग्य वेळी मला सोडून दिले. नाहीतर मला माझं कोण आणि परकं कोण हे कधीच समजू शकलं नसतं. त्या काळात मला माझ्या जवळच्या लोकांनी चांगली साथ दिली.  त्यामुळे घटस्फोटानंतर मी आणखी स्ट्रॉंग होऊ शकले आहे. पूर्वी मी विचार न करता निर्णय घेत होते आता मात्र मी कोणताही निर्णय विचारपूर्वक घेऊ लागले आहे. शिवाय घटस्फोटाच्या निर्णयामुळे मी आता माझ्या जीवनात पुढे जाण्यात यशस्वी झाले आहे.” नातं तुटल्यावर अनेक लोक निराश होतात, काहीजण डिप्रेशनच्या आहारी जातात मात्र या दोघांनी त्यांच्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. जेनिफरसोबत घटस्फोट झाल्यावर करणने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केलं आहे. करणचे हे तिसरे लग्न आहे. जेनिफरदेखील आता बेहद च्या दुसऱ्या भागातील मायाच्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे.


bipasha


सारा का ओरडत होती कार्तिकच्या नावाने, व्हिडिओ झाला व्हायरल


सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस


नीता अंबानी यांनी सूनमुख पाहून श्लोकाला दिलं 'हे' महागडं गिफ्ट


फोटोसौजन्य- इन्टाग्राम