श्रीदेवीच्या मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार 'मिर्झापूर' फेम पंकज त्रिपाठी

श्रीदेवीच्या मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार 'मिर्झापूर' फेम पंकज त्रिपाठी

मागच्या वर्षीची हिट फिल्म 'स्त्री' आणि नुकताच चर्चेत आलेला वेब शो 'मिर्झापूर' मधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलेला दिग्गज अभिनेता पंकज त्रिपाठी, आता अजून एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कठोर परिश्रम आणि अभिनयाला समर्पित असा हा बॉलीवूड अभिनेता प्रसिद्ध लढाऊ पायलट गुंजन सक्सेनावर बनणाऱ्या बायोपिक ‘कारगिल गर्ल’ मध्ये दिसणार आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🙏🙏🙏


A post shared by PankajTripathi©_ (@pankajtripathi__) on
धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मा करत असून सध्या याचं शूटींग लखनौमध्ये सुरू आहे. गुंजन सक्सेनाच्या भूमिकेत श्रीदेवीचा मुलगी जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हटलं जात आहे की, चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाच्या अंशुमन सक्सेनाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Just..


A post shared by Angad Bedi (@angadbedi) on
मागच्यावेळी अंगद बेदी सूरमा या चित्रपटात दिसला होता. कारगिल गर्ल च्या टीममध्ये आता अंगदचाही समावेश झाला आहे. तर पंकज त्रिपाठी या चित्रपटात जान्हवी कपूर आणि अंशुमन सक्सेनाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटात पंकज आणि जान्हवी दोघंही पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत.

'कारगिल गर्ल'चं पहिलं शेड्यूलचं शूटींग पूर्ण झालं आहे. अहमदाबादमधलं शूटींग 2 मार्चला पूर्ण होणार असून त्यानंतर पूर्ण युनिट मुंबईला येईल. त्यानंतर पुढच्या शूटींग शेड्यूलसाठी टीम पुन्हा एकदा लखनौला जाईल.


49354075 2270262073192893 479892412748050396 n
'कारगिल गर्ल'ची कहाणी लढाऊ पायलट गुंजन सक्सेनावर आधारित आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान गुंजन सक्सेनाही पहिली महिला ऑफिसर होती जिने युद्धामध्ये आपलं साहस दाखवलं होतं. तिच्या या साहसासाठी तिला शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

Prettiest 😍😍😍


A post shared by Janhvi Kapoor Official Fanpage (@jhanvi_kapoor_official) on
सूत्रानुसार, सेटवर काम करताना जान्हवी आणि पंकज यांच्यात खूप चांगल बाँडीग झालं आहे. पंकजने जान्हवीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. तसंच पंकज हा स्वतः जान्हवीची आई श्रीदेवीचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी श्रीदेवीच्या मुलीबरोबर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे.


50956093 823188028049805 5109619382297212426 n
'कारगिल गर्ल'च्या निमित्ताने जान्हवी कपूरला आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याचं दाखवण्याची संधी मिळाली आहे. तसंच दिग्गज कलाकारांबरोबर काम करायचाही अनुभव मिळतोय.


हेही वाचा -


वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक


गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन


2019 मध्ये बॉलीवूडमधल्या 'नव्या' जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला