जिया खानच्या बहिणीने केला साजिद खानवर विनयभंगाचा आरोप

 जिया खानच्या बहिणीने केला साजिद खानवर विनयभंगाचा आरोप

फिल्मी करिअरला सुरुवात करत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री जिया खान वयाच्या 25व्या वर्षी हे जग सोडून गेली. हत्या की आत्महत्या असे तिच्या मृत्यूचे गूढ इतक्या वर्षात कधीच उकलले नाही. कालांतराने हा विषय ही मागे पडत गेला. पण पुन्हा एकदा जिया खान सगळीकडे ट्रेंड होऊ लागली आहे. बीबीसीने बनवलेल्या एका डॉक्युमेंट्रीमुळे जियासोबत झालेल्या त्या सगळ्या घटनांची आठवण ताजी करुन दिली. या डॉक्युमेंट्रीच्या दुसऱ्या भागात जियाच्या बहिणीने असा काही धक्कादायक खुलासा केला आहे की, त्यामुळे चित्रपट निर्माता, दिग्दर्शक साजिद खान अडचणीत आला आहे. साजिद खानने जियासोबत गैरव्यवहार केल्याचे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. नेमकं या डॉक्युमेंट्रीमध्ये काय म्हणाली जियाची बहीण जाणून घेऊया.

जियाची बहीण करिश्मा केली साजिदची पोलखोल

बीबीसीने ‘डेथ इन बॉलिवूड’ नावाची ही डॉक्युमेंट्री बनवली असून पहिल्या भागामध्ये तिच्या मृत्यूची घटना दाखवण्यात आली आहे. तर दुसऱ्या भागात गंभीर अशा गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जियाची लहान बहीण करिश्माने साजिदवर निशाण साधत काही गंभीर आरोप केले आहेत. साजिदने हाऊसफुल्ल चित्रपटादरम्यान जियाशी अत्यंत किळसवाणा प्रकार केला. ज्यावेळी चित्रपटाची रिहर्सल सुरु होती. त्यावेळी साजिदने जियाला तिचे कपडे आणि अंतवस्त्र काढून विवस्त्र होण्यास भाग पाडले. जिया खानच्या हातात स्क्रिप्ट दिल्यानंतर त्याने अशा पद्धतीने तिचा विनयभंग केला.  तिने याचा विरोध केला आणि त्याला सांगितले की, अजून चित्रपटाची शूटिंगही सुरु झाली नाही आणि अशा गोष्टी केल्या जात आहेत. तिने घरी येऊन सगळा प्रकार सांगितला आणि ती खूप रडली होती. पण याला विरोध करण्यासाठीही त्यांनी जागा सोडली नाही असे सांगितले. जर या गोष्टीची कुठेही चर्चा केली तर तिची बदनामी केली जाईल असे सांगितले. शिवाय चित्रपट सोडला तर जियावर केस केसी जाईल असे देखील सांगितले. त्यामुळे जियाने हा चित्रपट केला. पण या काळात विनयभंग केला जाणार याची पुरेपूर माहिती तिला होती. 

माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' फेम अभिनेत्री प्राजक्ता परब अडकली विवाहबंधनात

करिश्मासोबतची केले गैरवर्तन

डेथ इन बॉलिवूड

जियासोबत करिश्मा साजिदच्या घरी गेली होती. त्यावेळी ती अवघ्या 16 वर्षांची होती. ती किचन टेबलवर बसली असताना साजिद खान तिथे आला आणि म्हणाला हिली सेक्सची गरज आहे. तिच्यासमोर अशा पद्धतीने बोलताना पाहून जिया लगेच तिथे आली आणि तिने बहिणीचा असा कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. ती अजून लहान आहे तिला त्यातले काहीही कळत नाही. पण तरीही साजिद माझ्या बसण्याचा पद्धतीवरुन जियाला म्हणाला, तिच्या बसण्याची पद्धत सगळं काही सांगून जातं आहे. पण जियाने साजिदला करिश्मापासून दूर केल्याचे करिश्माने सांगितले. त्यानंतर ते साजिदच्या घरातून निघून गेले. 

शाहिद कपूर साकारणार आता महाभारतातील 'कर्ण'

अनेकांनी केले साजिदवर आरोप

2018 साली संपूर्ण देशात #MeToo ची लाट उठली. यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींनी साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. साजिद चित्रपटांच्या निमित्ताने घरात बोलवून सुंदर मुलींना त्यांचयासमोर कपडे काढण्यास भाग पाडतो. तसे केले नाही तर नाव खराब करण्याची धमकी देतो. असे  अनेक किस्से आतापर्यंत अनेकांनी सांगितले आहेत. आता या नव्या खुलास्यानंतर साजिदवर आणखी एक आरोप लागला आहे. दरम्यान त्याची बहीण फराह खानने या संदर्भात भावाला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचे त्यावेळी म्हटले होते. मुलींना न्याय मिळायला हवे असे तिने सांगितले होते. 


आता साजिदला याची तरी शिक्षा होणार का याची प्रतिक्षा आहे. 

Bigg Boss 14 : राहुल वैद्यला सतत केलं जातंय टार्गेट, मेकर्सवर फॅन्स नाराज