महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी सप्तपदी

महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी सप्तपदी

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही. अवघ्या 8 व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा-शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती, असे म्हणायला हरकत नाही. 1500 सालचा तो काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा. सनई–चौघड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताटं, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा. या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं ही असेल पण सोनी मराठीवर सुरू असलेल्या “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.

‘लाडक्या लेकीचं तळहात किती मऊ ,कुन्या राजाला कन्या देऊ’ त्याकाळी लखुजी जाधव यांची अवस्था काहीशी या ओवीसारखी झाली असेल. आपलं काळीज सासरी पाठवताना वडील लखुजी यांची घालमेल होते आहे. जिजा-शहाजींच्या मिलनाने भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यांची सोयरीक जुळणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या जिजाऊ-शहाजीराजेंच्या मिलनाचा हा क्षण अगदी नजरेत साठवावा असाच असणार. तर पाहायला विसरू नका असे अनेक क्षण जे तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जातील यात शंका नाही. 

‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्तपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशाली इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल, हे पाहणं फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.

View this post on Instagram

'स्वराज्यजननी जिजामाता' सोमवार ते शनिवार, रात्री 8.30 वाजता. फक्त सोनी मराठीवर! #स्वराज्यजननीजिजामाता | #SwarajyaJananiJijamata #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati दिग्दर्शक : विवेक देशपांडे @vivek.deshpande.906638 आणि अजय कुरणे कथा / पटकथा : विवेक आपटे आणि प्रसाद ठोसर @prasadthosar03 संवाद : प्रसाद ठोसर @prasadthosar03 DOP : योगेश जानी @dabsjani कला : नितीन कुलकर्णी, प्रतिक रेडीज, संजय करोले वेशभूषा : पूर्णिमा ओक रंगभूषा : राहुल सुरते @rahulsurate शीर्षक गीत : मंदार चोळकर @the_manndar शीर्षक गीत-संगीत : सत्यजित रानडे पार्श्वसंगीत : अभिजीत पेंढारकर @abhi21.music संकलन : सचिन नाटेकर निर्माते : डॉ. अमोल कोल्हे @amolrkolhe डॉ. घनश्याम राव @drghanya विलास सावंत @jagdamb_creations_official @prasad_satav @royalmarathi @jay__shivray @manojpatil_56 @chhatrapati_shivaji_maharaj @marathicelebs_com @ek_maharashtrian @maharashtrian_treasures @maratha_samrajy @jayostute_maharashtra @shivaji__maharaj @chatrapati_shivajimaharaj @chatrapati_shivaji_maharaj._ @chhatrapati_shivaji_maharaja @marathistars @marathisanmaan @shivaji_maharaj_photos @maharashtra_desha @ig_maharashtradesha @mazya_rajacha_maharastra @viralstarss @maharaj_shivaji @jay__shivray @shivaji_maharaj_photos @amhi_kattar_shivbhaktt @fakt_shivbhakt_96 @shivbhakt_96k_ @007maratha @fakt_shivbhaktt @chhatrapati_shivaji_maharaj_ @chhatrapati_sambhaji_maharaj @chhatrapati_shivaji_maharaja @chhatrapatishivajimaharaj @maharaj_sambhaji @mard_maratha007 @maharaj_sambhaji_bhosale @marathifc @maharashtra_forts @shivaji_maharaj123 @trekking_in_sahyadris @sahyadri_clickers @rava__official @heartcatcher_kaps @jagdamb_creations_official ..

A post shared by स्वराज्यजननी जिजामाता OFFICIAL (@swarajya_janani_jijamata) on

ऐतिहासिक वातावरणात जिजा-शहाजींची बांधली जाणारी गाठ प्रेक्षकांसाठी पाहणं खरंच विशेष ठरणार आहे. 4 ते 9 नोव्हेंबरदरम्यान हळदीपासून लग्नापर्यंतचे सगळे विधी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची अनेक वैशिष्ट्यं आहेत. 

  • भोरच्या ऐतिहासिक वाड्यातील चित्रीकरण 
  • पारंपारिक दागदागिने आणि पेहराव, 
  • त्याकाळातील रोषणाई, सजावट 

या सगळ्यांची ऐतिहासिक बांधणी या विवाह सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यासाठी त्याकाळातील असे खास दागिने तयार करून घेण्यात आले आहेत. या खास सोहळ्याला अजून विशेष करण्यासाठीच की काय म्हणून छान असे गाणे ही रचण्यात आले आहे.

महाराष्ट्र घडवणाऱ्या या सप्तपदीचे, जिजा आणि शहाजी यांच्या विवाह सोहळ्याचे याची देही याची डोळा साक्षीदार तुम्हीही व्हा आणि नक्की पहा अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.