जितेंद्र आणि जयाप्रदा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र

जितेंद्र आणि जयाप्रदा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र

बॉलीवूडमध्ये काही जोड्या इतक्या खास आहेत की, एका अभिनेत्याचं वा अभिनेत्रीचं नाव घेतलं की, दुसऱ्याचं नाव आपोआप ओठावर येतं. या जोड्या एकमेकांबरोबर बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडल्या आहेत. यामधील बॉलीवूडची सर्वात आवडती जोडी म्हणजे जम्पिंक जॅक जितेंद्र आणि सौंदर्याची खाण जयाप्रदा. या दोघांनी 20 पेक्षा अधिक चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. त्यावेळी या दोघांची जोडी एकत्र बघणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच होती. या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण गेल्या 24 वर्षांपासून या जोडीला एकत्र बघण्याचं भाग्य प्रेक्षकांना लाभलेलं नाही. पण आता हे भाग्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना लाभणार असून ही जोडी आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावायला तयार झाली आहे. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल ना? पण होय 80 च्या दशकातील ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा धमाल करायला तयार झाली आहे. फक्त फरक इतकाच आहे की, मोठ्या पडद्याऐवजी ही जोडी दिसणार आहे ती, लहान पडद्यावर अर्थात टेलिव्हिजनवर. त्यामुळे आता घराघरातील प्रेक्षकांना ही जोडी पाहता येणार आहे. भारतीय चित्रपटातील जम्पिंग जॅक जितेंद्र आणि क्लासिकल डान्सर जयाप्रदा आता एका डान्सिंग रियालिटी शो चे परीक्षक म्हणून एकत्र काम बघणार आहेत.


jaya
काय वेगळेपणा आहे या शो चा?


मिळालेल्या माहितीनुसार, या रियालिटी शो मध्ये फक्त 1980 आणि 1990 च्या दशकातील हिट डान्स नंबर्सवर परफॉर्म करण्यात येणार आहे. हा शो स्वीकारल्यानंतर अभिनेत्री जयाप्रदाने आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘या शोमधील प्रतिभाशाली मुलं पाहिल्यानंतर मी खूपच उत्साही आहे. या मुलांच्या माध्यमातून इतक्या सुंदर पद्धतीने डान्स करणं हे अद्भूत आहे.’ अशी प्रतिक्रिया जयाप्रदा यांनी दिली आहे. इतकंच नाही तर अप्रतिम डान्सर आणि ज्येष्ठ अभिनेता जितेंद्रदेखील या शो चा एक भाग असणार असल्यामुळे जयाप्रदा यांना अधिक आनंद झाला आहे. ‘मुलांबरोबर काम करणंं अतिशय सुखद आहे. माझा नातू लक्ष्यदेखील या स्पर्धकांप्रमाणेच एनर्जेटिक आहे त्यामुळे या स्पर्धकांबरोबर एक वेगळाच बंध निर्माण झाला आहे’ असंही जयाप्रदा यांनी सांगितलं आहे.


ekta jitendra
जयाप्रदा यांचं बॉलीवूडमध्ये नाव मोठं


जयाप्रदा यांना साऊथ चित्रपटांसाठी आतापर्यंत तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. जयाप्रदा यांनी तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तर जितेंद्र सध्या बालाजी टेलिफिल्म्स, बालाजी मोशन पिक्सर्स आणि एएलटी एंटरटेनमेंटचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. जितेंद्रच्या अनेक कंपन्यांमध्ये टेलिव्हिजनवरील अनेक मोठे शो आणि मालिका बनत असून जितेंद्रची मुलगी एकता कपूर त्याची सर्वेसर्वा आहे. शिवाय अनेक टीव्ही शो चा निर्माता म्हणूनही जितेंद्र काम करत आहे. पण या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा


अभिनेत्री मिनिषा लांबाचं हॉट बिकिनी शूट


‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’


#POPxoTurns5 आणि Luxeva च्या लॉंचपार्टीचं आयोजन