जिया चौहानने देवी पार्वतीची भूमिका साकारण्यासाठी स्वतःमध्ये केले असे बदल

जिया चौहानने देवी पार्वतीची भूमिका साकारण्यासाठी स्वतःमध्ये केले असे बदल

अभिनेत्री जिया चौहानने हिंदी टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. सध्या जिया एका पौराणिक मालिकेसाठी स्वतःमध्ये प्रंचड बदल करत आहे. जिया लवकरच टेलिव्हिजनवरील ‘संतोषी मॉं सुनाए व्रत कथाए’ या पौराणिक मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका ती साकारणार आहे. जिया ही भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे टेलिव्हिजनवर नव्वदच्या दशकातील पौराणिक मालिकांचे पुर्नप्रसारण सुरू होते. रामायण आणि महाभारत सारख्या मालिकांना या काळात पुन्हा  चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टेलिव्हिजन माध्यमांनी पौराणिक मालिकांच्या टीआरपीचा विचार करत नव्या एपिसोडमध्ये खास बदल केले आहेत. शिवाय कलाकार देखील या पौराणिक मालिकांमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत. 

जिया या भूमिकेसाठी अशी करत आहे मेहनत

टीव्‍हीवरील मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये पार्वतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेच्‍या माध्‍यमातून ती पौराणिक शैलीमध्‍ये पुनरागमन करत आहे आणि तिला या मालिकेचा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे.देवी पार्वतीची भूमिका साकारण्‍याबाबत आनंदित झालेल्या जिया चौहानने आपला अनुभव शेअर केला, ''मला पुन्‍हा एकदा पौराणिक शैली साकारण्‍याचा आनंद झाला आहे. मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये मी दीर्घकाळानंतर देवी पार्वतीची भूमिका साकारणार आहे. मी ही मालिका पाहत आले आहे आणि मला अशा प्रकारची प्रबळ भूमिका साकारण्‍याची अद्वितीय संधी मिळाली असल्‍यामुळे खूपच चांगले वाटत आहे. या शैलीपासून काहीसे दूर राहिल्‍यामुळे मी भाषाशैली आत्‍मसात करण्‍यासाठी भक्‍तीमय कथा वाचत आहे आणि भूमिकेमध्‍ये संयमता आणण्‍यासाठी वारंवार चिंतन देखील करत आहे. हे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे, सध्या छोट्या पडद्यावर देवीची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली असल्‍यामुळे समाधान देखील वाटत आहे. मी नियमित सरावासह पुन्‍हा एकदा या शैलीमध्‍ये निपुण होण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.'' जियाने यापूर्वी अरबल, नारायण नारायण, मेरी दुर्गा या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

काय असणार मालिकेच्या नव्या एपिसोडमध्ये

'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'च्‍या आगामी नवीन एपिसोड्समध्‍ये सिंघासन सिंग आणि संतोषी माँची निस्‍सीम भक्‍त स्‍वाती यांच्‍यामधील अत्‍यंत तणावपूर्ण क्षण पाहायला मिळणार आहेत. सून स्‍वातीला घराबाहेर काढण्‍याचा निर्धार केलेला सिंघासन सिंग वरदान मिळवण्‍याच्‍या उद्देशाने संतोषी माँ व्रत करण्‍यासाठी त्‍याच्‍या कुटुंबासोबत संपूर्ण समुदायाला एकत्र आणणार आहे. यामुळे संतोषी माँ धर्म-अधर्म, तिची निस्‍सीम भक्‍त स्‍वाती आणि दुष्‍ट सिंघासन सिंग यांच्‍यामधून निवड करण्‍याच्‍या दुविधेमध्‍ये सापडणार आहे. रश्‍मी शर्मा टेलिफिल्‍म्‍सची निर्मिती असलेली मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' ही लक्षेवधक कथा 'भक्‍ती व भगवान' यांच्‍यामधील निर्मळ नात्‍याला सादर करणार आहे.'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'चे नवीन रोमांचक एपिसोड्स 13 जुलै 2020 पासून रात्री 9 वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून जियाला पार्वती देवीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.