रोमियो अकबर वॉल्टरमध्ये जॉन अब्राहमचा  ‘हटके’ अंदाज

रोमियो अकबर वॉल्टरमध्ये जॉन अब्राहमचा  ‘हटके’ अंदाज

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमचा नवीन चित्रपट ‘रोमियो अकबर वॉल्टर’चं पोस्टर नुकतच रिलीज झालं आहे. या चित्रपटात जॉन अगदी हटके लुकमध्ये दिसत आहे. लुकवरुन जॉनची भूमिका सत्तरच्या दशकातील एखाद्या व्यक्तिमत्वाची आहे असं वाटत आहे.  या पोस्टरसोबत त्याने ‘वन मॅन मेनी फेसेस. वन मिशन- टू प्रोटेक्ट हिज कंट्री’ अर्थात ‘एक माणूस अनेक चेहरे. एक मिशन - देशाच्या सुरक्षेसाठी. रॉ एक देशभक्ताच्या जीवनावर आधारित सत्य घटना’ असं त्याने शेअर केलं आहे. यावरुन हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असण्याची शक्यता आहे. शिवाय या पोस्टरमध्ये जॉनची विविध रुपंदेखील दिसत आहेत. रोमियो अकबर वॉल्टर चित्रपट देशाच्या सुरक्षेवर आधारित असून त्यामध्ये जॉनचे निरनिराळे लुकमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. रोमियो अकबर वॉल्टर हा चित्रपट 12 एप्रिल 2019 मध्ये प्रदर्शित होत आहे. या पोस्टरमुळे जॉनच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली आहे.
'रोमियो अकबर वॉल्टर' चित्रपट स्पाय थ्रिलर असण्याची शक्यता


रोमियो अकबर वॉल्टर हा चित्रपट सत्तरच्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचं शूटींग गुजरात,श्रीनगर, दिल्ली आणि नेपाळच्या बॉर्डरवर करण्यात येत आहे. या  चित्रपटात जॉन एखाद्या गुप्तहेराची भूमिका करणार असं वाटत आहे. जॉनची या चित्रपटातील भूमिका एक आव्हानात्मक भूमिका असल्याने त्यासाठी जॉनला विविध प्रकारचं ट्रेनिंग घ्यावं लागलं आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. जॉनसोबत या चित्रपटात मोनी रॉय, जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमुर्ती, सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.आधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतला विचारण्यात आल्याचीही चर्चा आहे.रॉबी ग्रेवाल या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.


john abraham 1


जॉनचा देशभक्तीवर आधारित आणखी एक चित्रपट


जॉनने यापूर्वी ‘परमाणू - द स्टोरी ऑफ पोखरण’ आणि ‘सत्यमेव जयते’ अशा  देशभक्तीवर आधारित चित्रपटामध्ये काम केलं आहे. जॉन अब्राहम बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जॉन एक उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो एक चांगला मॉडेलदेखील आहे. मागील वर्षी ‘सविता दामोदर पराजंपे’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून जॉनने प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.


 


 


आणखी वाचा


Baaghi 3' चं पोस्टर रिलीज


संजय जाधव यांच्या ‘लकी’ (Luckee) चित्रपटाचं ट्रेलर रिलीज


मणिकर्णिका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला खास ऐतिहासिक टच


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम