होम डिलिव्हरी झालेल्या भाज्या पाहून अभिनेत्री जुही चावला संभ्रमात

होम डिलिव्हरी झालेल्या भाज्या पाहून अभिनेत्री जुही चावला संभ्रमात

अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) काही वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. एवढंच नाही तर सोशल मीडियावरून एखाद्या सामाजिक प्रश्नांवर बेदढक भुमिका मांडणं ही तर तिची खासियतच आहे. जुही चावला पर्यावरण प्रेमी असून ती सोशल मीडियावरून याबाबत नेहमीच जनजागृती करत असते. सहाजिकच ती सोशल मीडियावर यासाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतंच एका ट्विटमुळे जुही चावला पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या लॉकडाऊन संपल्यामुळे प्रत्येकाच्या घरी भाज्या आणि फळांची होम डिलिव्हरी सुरू झाली आहे. जुहीनेही तिच्या घरी काही फळं आणि भाज्यांची ऑर्डर दिली होती. मात्र या भाज्या आणि फळांची होम डिलिव्हरी पाहून जुही चक्क संभ्रमात पडली आहे. जाणून घ्या यामागचं नेमकं कारण...

भाज्या पाहून जुही का पडली संभ्रमात

जुहीने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. ज्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. जुहीने लिहीलं आहे की, "अशा पद्धतीने माझ्या घरी भाज्यांची होम डिलिव्हरी झालेली आहे. ज्या भाज्या चक्क प्लास्टिकमध्ये बुडाल्या आहेत. वास्तविक सुशिक्षित लोकच पृथ्वीवर सर्वात जास्त कचरा निर्माण करत आहेत. ज्यामुळे मला आता हसावं की रडावं हेच कळत नाही आहे" जुहीच्या घरी डिलिव्हर झालेल्या या भाज्या चक्क प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत. ज्यामुळे भाज्या घरपोच झाल्याच्या आनंदापेक्षा त्यासाठी गुंडाळलेलं प्लास्टिक पाहून जुहीला नक्कीच राग आला आहे. जुहीच्या या उपहासात्मक ट्विटला लोकांनी चांगलाच प्रतिसाद द्यायला सुरूवात केली आहे. ज्यावर नेटकऱ्यांच्या कंमेटचा अक्षरशः पाऊसच पडत आहे. जुहीने या ट्विटसोबत घरी डिलिव्हर झालेल्या भाज्यांचा फोटोही शेअर केला आहे. जुही चावला ही एक पर्यावरण प्रेमी व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. ती तिच्या मित्रमैत्रिणींना देखील त्यांच्या वाढदिवशी एखादं लहानसं रोपच गिफ्ट देते. याचप्रमाणे ती सतत पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते. आता अशा व्यक्तीच्या घरीच या पद्धतीने भाज्या होम डिलिव्हरी झाल्यामुळे हा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आजही लोकांच्या लक्षात आहे कयामतमधील 'रश्मी'

जुही चावलाचे चाहते अनेक आहेत. बॉलीवूड अभिनेत्री असण्यासोबतच तीने 1984 साली मिस इंडियाचा पुरस्कारही मिळवला होता. जुहीने कयामत से कयामत तक या चित्रपटातून आमिर खानसोबत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर पोहचवलं. कयामतमधील तिची भूमिका पाहून अनेकांनी आपल्या मुलींचे नाव 'रश्मी' असं ठेवलं होतं. तिचे इश्क, येस बॉस, ड्युप्लिकेट, डर असे अनेक बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते. लग्नानंतर जुही बॉलीवूडपासून दूर झाली असली तरी तिने 2017 मध्ये 'दी टेस्ट केस' या वेबसिरिजमध्ये एक महत्त्वपू्र्ण भूमिका साकारली होती. त्यामुळे यापुढेही तिला पुन्हा एखाद्या महत्वाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

खूप दिवसांपासून तुमची आमची भेट झाली नव्हती. पण आता गॉसिप, मेकअप टीप्स आणि तुमच्या आवडीचे सगळे विषय घेऊन POPxo marathi पुन्हा आलं आहे.

अधिक वाचा -

कोरोनाच्या काळातही चित्रपट होणार रिलीज, पण या ठिकाणी

चित्रपटात खलनायिका साकारूनही 'या' अभिनेत्री ठरल्या यशस्वी

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री