शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं नोंदवला ‘हा’ नवा रेकॉर्ड

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं नोंदवला ‘हा’ नवा रेकॉर्ड

बॉलिवूडमधील कित्येक सिनेमांनी वर्ष 2019 चांगलंच गाजवलं आहे. पण अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा वादग्रस्त ठरलेला सिनेमा ‘कबीर सिंह’नं अनोखा विक्रम नोंदवला आहे. शाहिदच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं गुगलवर सर्वाधिक सर्च  केला गेल्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. याची पुष्टी खुद्द गुगलकडून देण्यात आली आहे.  या सिनेमामुळे शाहिदच्या बॉलिवूडमधील करिअरला नवं वळण प्राप्त झालं आहे. रिलीजनंतर सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण शाहिदच्या अभिनयाचे चाहत्यांसह बॉलिवूडकरांनी तोंडभर कौतुक केलं. या सिनेमाच्या निमित्तानं चाहत्यांना शाहिदचं निराळंच रूप पाहायला मिळालं. कियाराच्या नो मेक-अप लुकनंही सिनेरसिकांवर मोहिनी घातली. बॉक्सऑफिसवर कबीर सिंह सिनेमानं तब्बल 250 कोटी रुपयांहून अधिक रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षक आजही युट्यूब हा सिनेमा सर्च करत आहेत. यातील गाणी तर सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड गाजली. आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आणि प्ले-लिस्टमध्ये कबीर सिंहची गाणी कायम आहेत.

(वाचा: दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर पाहून परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला...)

View this post on Instagram

Thank you for the overwhelming love. #kabirsingh

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’

कबीर सिंह हा  तेलुगूतील सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा (Arjun Reddy) रिमेक आहे. संदीप रेड्डी वांगा यांनीच तेलुगू आणि हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. सिनेमात दाखवल्याप्रमाणे वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या कबीर सिंहला (शाहिद कपूर) कॉलेजमधील प्रीतिवर प्रेम जडतं. हे प्रेमदेखील काही काळासाठी किंवा क्षणिक नाही तर जिवापाड प्रेम असते. पण कौटुंबिक समस्यांमुळे या दोघांमध्ये दुरावा येतो. यामुळे कबीर सिंह मानसिकरित्या पूर्णतः कोलमडतो, पण त्याचं प्रीतिवरील प्रेम काही आटत नाही. त्यातही  मोठी अडचण असते ते म्हणजे त्याला येणारा राग. नैराश्यात कबीर सिंहला अंमली पदार्थांचं व्यसन लागते. कबीरच्या झीरो अँगर बॅलन्समुळे त्याच्या आणि प्रीतिच्या आयुष्यात गुंतागुंत वाढत जातो. हॅप्पी ए़ंडिंग कसं होते, यासाठी सिनेमा तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर नक्की पाहा. 'कबीर सिंह'चं बजेट जवळपास 60 कोटी रुपये एवढं होतं आणि सिनेमानं त्याही पेक्षा अधिक कोटी रुपयांची कमाई करत रेकॉर्ड नोंदवला आहे. 2019 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला सिनेमा असा विक्रमही कबीर सिंहनं नोंदवला आहे. 

(वाचा : लतादीदींना 28 दिवसांनंतर मिळाला डिस्चार्ज, हॉस्पिटलमधील PHOTO VIRAL)

‘कबीर सिंह’साठी मीरानं केली होती शाहिदची मनधरणी

कबीर सिंह सिनेमामध्ये काम करावा यासाठी पत्नी मीरानं कित्येक प्रकारे माझी मनधरणी केली होती, असं शाहिद कपूरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. कबीर सिंह या भूमिकेबाबत आणि यातील किसिंग सीनमुळे शाहिद द्विधा मनस्थितीत होता. पण मीरा याबाबत फारच सकारात्मक होती, असं शाहिदनं सांगितलं. मुलाखतीत शाहिदनं सांगितलं की, ‘आम्ही दोघांनीही तेलुगू सिनेमा अर्जुन रेड्डी एकत्र पाहिला आणि आम्हाला संदीपचं काम खूपच आवडलं. हा सिनेमा माझ्या यादीत असलाच पाहिजे, असं मीरा म्हणाली. योग्य प्रकारे कबीर सिंहची भूमिका साकारली तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि प्रेक्षकांनी खरंच सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला’. 

(वाचा : चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान)

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.