नेहा कक्करच्या लग्नाची बातमी ताजी असताना आता सिंघम फेम काजल अग्रवालच्या लग्नाचीही बातमी आता समोर येऊ लागली आहे. काजल अग्रवाल हिने या बातमीची पुष्टी केली नसली तरी देखील अनेक सोर्सने दिलेल्या माहितीनुसार तिचे लग्न करणे ठरले असून मुंबईमध्ये तिचे लग्न होणार आहे. काजल अग्रवालच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून तिच्या लग्नाचा सोहळा हा दोन दिवस चालणार आहे असे देखील कळत आहे. काजल अग्रवालच्या जोडीदाराविषयी अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. पण तरीही तिचा होणारा नवरा उद्योगपती असल्याचे कळत आहे. जाणून घेऊया काजल अग्रवालचा हा लग्नसोहळा नेमका कसा असणार आहे.
Bigg Boss 14: च्या या स्पर्धकाविषयी काय म्हणाला पारस छाबडा
उद्योगपतीसोबत अडकणार विवाहबंधनात
काजल अग्रवाल कोणासोबत लग्न करणार असा प्रश्न जर अनेकांना पडला असेल तर काजल अग्रवाल ही एका उद्योगपतीशी लग्न करणार आहे. काजल ही उद्योगपती गौतम किचलू याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. गौतम किचलू हा उद्योगपती असून त्याला इंटेरिअरची आवड असल्याची माहिती ही समोर येत आहे. काजलचे हे लग्न अरेंज्ड मॅरेज असून तिचा साखरपूडा आधीच झालेला आहे. त्यामुळे आता फक्त लगीनघाईच राहिली आहे. काजलचा हा लग्नसोहळा मुंबईत होणार असल्याचे कळत आहे. मुंबईत हा सोहळा दोन दिवस चालणार आहे. पण या संदर्भात अजून कोणतीही माहिती अद्याप समोर आली आहे.
काजलवर शुभेच्छांचा वर्षाव
काजल लग्न करणार हे कळल्यानंतर अनेकांनी तिच्यावर लग्नासाठी शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये एका काळ्या बॅकराऊंडवर हार्ट शेप असा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने काहीही लिहले नाही. त्यामुळेच हे तिने लग्नाचे संकेत दिले आहेत. आता काजल अग्रवाल स्वत: या लग्नाची बातमी कधी देते याची अनेक जण वाट पाहात आहे. पण या फोटोवरुन काजल अग्रवाल खरंच लग्न करत आहे हे नक्की झाले आहे. आता प्रतिक्षा आहे फक्त लग्नांच्या फोटोची
या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण
कसा असेल लग्नसोहळा
काजल मुंबईत लग्न करणार अशी बातमी समोर येत आहे. मुंबईत दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात नेमके काय काय असणार?याच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत. या सोहळ्याच्या वेन्यूपासून ते मेन्यूपर्यंतच्या चर्चा या आता सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत.
काजलचा बॉलिवूडचा दबदबा
काजल ही तामिळ चित्रपटातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. 2004 साली ‘क्यो हो गया ना’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ऐश्वर्या रॉय आणि विवेक ओबेरॉयसोबत तिने या चित्रपटात काम केले होते. पण तिला खरी ओळख मिळाली ती सिंघम या चित्रपटामुळे. अजय देवगणसोबत तिने केलेले काम अनेकांच्या लक्षात राहिले आहे.
आता काजल अग्रवालच्या लग्नाचे फोटो येण्याची सगळ्यांना प्रतिक्षा आहेत.
अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकत आहे आरव, ट्विंकलने शेअर केली ही खास गोष्ट