Good News: कल्कीने दिली गोड बातमी, केला होणाऱ्या बाळाबद्दल खुलासा

Good News: कल्कीने दिली गोड बातमी, केला होणाऱ्या बाळाबद्दल खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने आपण गरोदर असल्याची good news नुकतीच शेअर केली आहे. कल्कीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘सॅक्रेड गेम्स 2’ मधील तिच्या व्यक्तिरेखेसाठी तिचं खूपच कौतुक झालं आहे. कल्कीने याआधीदेखील बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. कल्कीने दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर लग्न केलं होतं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तरीही या दोघांमधील मैत्री कायम आहे. 

Good news: अॅमी जॅक्सनला झाला मुलगा, फोटो व्हायरल

कल्कीने स्वतः केला खुलासा

View this post on Instagram

It's always a Sunday when I'm with my favourite caveman🥰

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

कल्कीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. कल्कीला सध्या 5 वा महिना चालू असून ती लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तसंच आपलं बाळ या जगात येताना बेबी वॉटर थेरपीने जन्माला यावं अशी कल्कीची इच्छा आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही गोड बातमी शेअर केली आहे. तसंच गरोदर असतानाही ती काम करत राहणार असल्याचं सांगितलं आहे. पण काम करत असली तरीही ती स्वतःची आणि बाळाची काळजी घेत काम करणार आहे. कल्की सध्या बॉयफ्रेंड Guy Hershberg याच्याशी रिलेशनमध्ये आहे. तर तिचा बॉयफ्रेंड हा इझराईलमधील क्लासिक पेंटर आहे. काही दिवसांपूर्वीच कल्की आणि  Guy Hershberg चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हाच कल्की पुन्हा एकदा नात्यात असल्याचं तिच्या चाहत्यांना कळलं. पण आता ही गोड बातमी देत कल्कीने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. 

वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत टीव्हीवरील ‘या’ जोड्या

राहणीमानात झालाय बदल, कल्कीने केलं मान्य

कल्कीने अनुरागशी लग्न केलं तेव्हा तिला बाळ नको होतं. पण आता मात्र तिच्या विचारांमध्ये आणि राहणीमानामध्ये खूपच बदल झाल्याचं तिने मान्य केलं आहे. ‘मला आतापासूनच स्वतःमधील बदल जाणवत आहेत. मी सध्या ज्या तऱ्हेने प्रतिक्रिया देते, त्यावरून मी अधिक डेलिब्रेट, आळसावलेली आणि शांत झाले आहे हे मला जाणवतंय. तुमच्यामध्ये जेव्हा आईपण जागृत होतं तेव्हा तुमच्या आत मनामध्ये खूपच बदल घडून येतात’ असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तसंच सध्या ती आपल्या बॉयफ्रेंडबरोबर वॉकला जाणं, योगा करणं आणि गाणी ऐकणं या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असल्याचंही तिने म्हटलं आहे. आता आपण आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत असून कुटुंबाचं महत्त्व आपल्याला पटलं असल्याचंही तिने मान्य केलंय. इतकचं नाही तर या वर्षाच्या शेवटी ती गोव्याला शिफ्ट होणार असून आपल्या बाळाला तिथेच जन्म देणार असल्याचंही तिने सांगितलं आहे. 

‘हिरकणी’ येत आहे प्रेक्षकांचं मन जिंकायला...

अनुराग कश्यपबरोबर दोन वर्षात घेतला घटस्फोट

कल्की कोचलिनने 2011 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर लग्न केलं होतं. मात्र केवळ 2 वर्षात दोघेही वेगळे झाले. पण त्यांनी आपल्यातील मैत्री तशीच ठेवली. 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. कल्कीने यावर्षी ‘गलीबॉय’ आणि ‘सेक्रेड गेम्स 2’ मधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आणि या दोन्हीमधून तिचं कौतुक झालं. कल्कीने अनुरागबरोबर लग्न केलं तेव्हा तिचे विचार वेगळे होते आणि आताची कल्की वेगळी असून विचार बदलले असल्याचं तिने सांगितलं आहे.

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सूटदेखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.