कल्की केकलाच्या प्रेग्नंसीवर चर्चा, असे दिले प्रश्न करणाऱ्यांना उत्तर

कल्की केकलाच्या प्रेग्नंसीवर चर्चा, असे दिले प्रश्न करणाऱ्यांना उत्तर

कल्की केकला सहा महिन्यांची गरोदर आहे. तिच्या आयुष्यात आता एक नवा पाहुणा येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी ती सज्ज झाली आहे.पण आला नेटीझन्सना नको ते प्रश्न पडू लागले आहेत. कल्कीने चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्याचे जगजाहीर आहे. मग आता तिच्या या मुलाचे वडील कोण? अशी चर्चा रंगू लागली आहे. कल्कीपर्यंत ही गोष्ट पोहोचल्यानंतर कल्कीने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.

Good News: कल्कीने दिली गोड बातमी, केला होणाऱ्या बाळाबद्दल खुलासा

शेक्सपिअरचा घेतला आदर्श

Instagram

कल्कीने ज्या दिवसापासून तिच्या प्रेग्नंसीबद्दल सगळ्यांना सांगितले आहे. त्या दिवसापासून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण समाजात काही लोक अशीही असतात ज्यांना नको त्या गोष्टीमध्ये फार रस असतो. कल्कीच्या बाबतीतही असेच काही झाले आहे. ती पहिल्यांदाच आई बनणार असून ती आणि तिच्या बॉयफ्रेंडने मुलाला जन्म द्यायचा निर्णय घेतला आहे. तिच्या बॉयफ्रेंडबद्दल तिने फार काही माहिती न दिल्यामुळे काहींनी तिला मूल कोणाचे असा खोचक प्रश्न विचारला. पण त्यावर काहीही न चिडता किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देता तिने एका मुलाखतीत सांगितले की, मला माहीत आहे की, खूप लोक माझ्याबद्दल उलट सुलट बोलत आहेत. पण माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे ते काय बोलतात याचा मला काहीच फरक नाही.पण सुदैवाने मी जेथे राहते तेथील शेजारी फारच चांगले आहेत. त्यांच्या कानावरही मी लग्न न करता आई झाल्याच्या गोष्टी गेल्या असतील. पण तरीही या काळात जी काळजी घ्यायला हवी ती काळजी ते आपुलकीने घेतता. त्यामुळे मी चांगल्या गोष्टी घेऊन माझ्या बाळाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. 

कपड्यांवरुनही टीका

Instagram

कल्की केकलाच्या प्रेग्नंसीवर चर्चा होत असताना तिच्या कपड्यांवरही टीका होत असल्याचे तिने सांगितले. मी तंग कपडे घालते असे मला लोक सांगतात. पण मी जर या कपड्यांमध्ये अगदी आरामात राहू शकत असेल तर मग कपड्यांवरुन टीका का?  पण हे सांगतानाही तिने म्हटले की, आता तो ज्याचा त्याचा प्रश्न 

डिसेंबरमध्ये होणार बाळाचा जन्म

Instagram

कल्की केकलाच्या घरी डिसेंबरमध्ये पाहुणा येणार असल्याची माहिती तिने दिली असून या आधीही तिने तिच्या डिलीव्हरीबाबक फारच स्पष्ट मत मांडली आहेत. तिला वॉटर डिलीव्हरीच्या माध्यमातून आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे. तिने यासाठी गोव्याची निवड केली आहे. सध्या तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत नाही. पण त्याने गायलेली गाणी ऐकून सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. कल्कीने आपल्या बाळाचे नावही ठरवले असून मुलगा किंवा मुलगी कोणीही झाल्यावर ते नाव तिला ठेवता येणार आहे.या  गरोदरपणातही कल्कीने ब्रेक घेतला नाही. तर ती काम करत आहे. सध्या ती झी5 च्या भ्रम या सीरिजमध्ये दिसत आहे. 

 कल्की केकलाच्या pregnancyवर अनुराग कश्यपने दिली ही प्रतिक्रिया

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.