'शहीद भाई कोतवाल'मध्ये कमलेश सावंत साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

'शहीद भाई कोतवाल'मध्ये कमलेश सावंत साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

अनेक हिंदी मराठी चित्रपटातून लक्षवेधी अभिनय करणारे कमलेश सावंत स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बहुचर्चित 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात कमलेश शहीद गोमाजी पाटील ही भूमिका साकारली आहे. 24 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर  सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत. भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा ही यात पहायला मिळणार आहे.

(वाचा : जिजाऊंचा इतिहास 'जिऊ'च्या स्वरुपात झळकणार मोठ्या पडद्यावर)

'सिनेमातून अनुभवायला मिळेल स्फूर्तिदायक इतिहास'

शहीद भाई कोतवाल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र सेना स्थापन केली. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांन वीरमरण आलं. भाई कोतवाल यांच्यावर आधारित या चित्रपटात शहीद गोमाजी पाटील यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. एक स्फूर्तिदायक इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, अशी भावना कमलेश सावंत यांनी व्यक्त केली.  या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

‘शहीद भाई कोतवाल’
'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग' असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ यांच्यावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘इभ्रत’
एक अस्सल मराठमोळं प्रेमी युगुल आहे मल्हार मायडी. ही जोडी इभ्रत नावाच्या प्रेमकथेतून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत. तरल आणि प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.