कंगना रनौतला आवरता आला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह

कंगना रनौतला आवरता आला नाही  पाणीपुरी खाण्याचा मोह

कंगनाची स्लीम आणि परफेक्ट फिगर पाहता ती जंक फूड खात नसेल असे वाटेल. पण कंगना एकदम शुद्ध देसी मुलगी आहे हे तिने दाखवून दिले आहे. कारण तिने नुकताच पाणीपुरीचा आनंद घेतला आहे. दिल्लीतल्या एका चाट कॉर्नरवर जाऊन तिने मस्त पाणीपुरीवर ताव मारला आहे. तिचा एक फोटो तिच्या फॅन्सनी देखील शेअर केला आहे. त्यामुळे कंगनाच्या खुबसुरतीचा राज तिचे हा देसीपणा आहे हेच म्हणायला हवे.


सोनालीचा स्टनिंग लुक ठरतोय सगळ्यांसाठीच प्रेरणा


 पाणीपुरी आणि कंगना


kangana fi


गेल्या काही दिवसांपासून कंगना फक्त तिच्या कॉन्ट्राव्हर्शिअल स्टेटमेंटमुळे लोकांच्या लक्षात राहिली आहे. कारण ती नेहमीच प्रत्येक गोष्टीवर स्वत:चे मत व्यक्त करते आणि त्यामुळे ती भांडणे ओढावून घेते. पण कंगनाची ही फूडी बाजू मात्र कोणालाच माहीत नव्हती. हा फोटो दिल्लीतील असून तेथील एका प्रसिद्ध चाट कॉर्नरवर जाऊन तिने पाणीपुरीचा आनंद घेतला आहे. कंगनाच्या हातातील ही पाणीपुरीची प्लेट पाहिली तर तुमचाही पाणीपुरी खाण्याचा नक्कीच मोह होईल.


मस्त बिनधास्त कंगना


कंगना नेहमीच अशा बिनधास्त अवतारात दिसत असते. ती जितकी फॅशनेबल राहते. तितकीच ती साध्या रुपातही बाहेर फिरत असते. आता तिचा हा लुकही मस्त राऊडी आहे. तिने कॉटनचा फुल स्ट्रेट फिट ड्रेस घातला आहे आणि त्यावर मस्त स्लिपर्स घातले आहे. तिचा हा लुक एका नव्या चित्रपटाची तयारी आहे.याशिवाय कंगनाने या आधी तिच्या दुसऱ्या चित्रपटासाठी पोलिसाच्या गणवेशात दिसली होती.ही लेडी दबंग तिच्या आणखी एका चित्रपटाच्या तयारीत गुंतली आहे. 

दबंग ३ च्या चित्रीकरणाचा व्हिडिओ व्हायरल


कंगना घेणार आहे पंगा


आता कंगना सध्या दिल्लीत आहे ती एका चित्रपटाच्या शुटींगसाठी. पंगा नावाचा चित्रपट ती करणार आहे.  हा चित्रपट एका कबड्डी खेळाडूवर आधारीत आहे. याआधी देखील कबड्डीची प्रॅक्टिस करतानाचा तिचा एक फोटो व्हायरल झाला होता आणि आता पंगाच्या शुटींगदरम्यानचा तिचा हा फोटो व्हायरल झाला आहे.


kangana panga


कंगनासाठी हे वर्ष आहे खास


मणिकर्णिका चित्रपटाला फार पसंती मिळाली नसली तरी  कंगनासाठी हे वर्ष खास आहे. क्वीननंतर कंगनाकडे फारसे चांगले चित्रपट नव्हते. पण आता कंगनाकडे पंगा, मेंटल हे क्या आणि जयललिता यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक आहे. त्यामुळे कंगनाचा भाव किती वाढला ते तुम्हाला कळालेच असेल. या शिवाय कंगना वरचेवर तिच्या स्पष्ट बोलण्यातून बॉलीवूडच्या कलाकारांवर निशाणा साधत असते. करण जोहर आणि तिच्यात रंगलेल्या नेपोटिझमचा वाद तर २०१८या वर्षात चांगलाच गाजला. सबंध बॉलीवूड तिच्या विरोधात गेले पण तरी देखील कंगनाने हा लढा एकटा देत करणला चांगलेच उत्तर दिले.


सुव्रत आणि सखी अडकणार लग्नबंधनात


बायोपिकसाठी घेतले सगळ्यात जास्त पैसे


जयललिताच्या बायोपिकसाठी कंगनाने सगळ्यात जास्त पैसे घेतले आहे. तिला हा रोल साकारण्यासाठी तिने २४ कोटी रुपये घेतले आहेत. एका रोलसाठी इतके पैसे आतापर्यंत कोणत्याच अभिनेत्रींनी घेतले नाही तितके पैसे कंगनाने या रोलसाठी घेतले आहेत. त्यामुळे कंगनाचा भाव वाढला आहे असे म्हणायला हवे.


kangana deepika fi %281%29


(सौजन्य- Instagram)