बॉलीवूडची ‘क्वीन’ लवकरच करणार लग्न, नात्याबद्दल केला खुलासा

बॉलीवूडची ‘क्वीन’ लवकरच करणार लग्न, नात्याबद्दल केला खुलासा

बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचं लग्न म्हटलं की त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. सोनम-आनंद, दीपिका-रणवीर, प्रियंका-निक आणि अनुष्का-विराट या सगळ्यांच्या लग्नानंतर आता बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या गोष्टीचा खुलासा खुद्द 'रिवॉल्वर रानी'ने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. इतकंच नाही तर आपल्याला आवडणारा माणूस कसा आहे याबद्दलही तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. खरं तर आपली बोल्ड स्टेटमेंट्स आणि खासगी आयुष्य या दोन्हीबद्दल कंगना नेहमीच चर्चेत असते.  अगदी आदित्य पांचोली असो अथवा हृतिक रोशन या दोघांबरोबरची तिची अफेअर खूपच गाजली. पण कंगनाने आता पुन्हा तिच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचं स्पष्ट केलं आहे. कंगनाने सांगितलं की, "माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. मी आता आयुष्याच्या ज्या वळणावर आहे तिथे मला आता रेग्युलर डेटिंगची आवश्यकता भासत नाही. मी आता असा वयात पोहचले आहे जिथे मला अशी एक व्यक्ती हवी जी मला आयुष्यात प्रेरणा देऊ शकेल आणि अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे.” 

आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत

प्रेमापती कंगनाची दृष्टी आता वेगळी

कंगना ही नेहमीच बोल्ड म्हणून ओळखली जाते. तिने आजपर्यंत नेहमीच बिनधास्त वक्तव्य केली आहेत. पण आता प्रेमाप्रती आपली दृष्टी बदलली असल्याचं कंगनाने स्पष्ट केलं आहे. ‘एक वय असतं, जेव्हा नात्यात आपण आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवतो. आता मी तशी अजिबातच राहिले नाही. मला हाताळणं आता खरं तर पहिल्यापेक्षा अधिक सोपं झालं आहे.’ असं कंगनाने म्हटलं आहे. याच दरम्यान कंगनाने आपल्या पहिल्या प्रेमाची आठवणही शेअर केली. याबद्दल सांगताना कंगना म्हणाली की नववीमध्ये असताना माझं माझ्या टीचरवर क्रश होतं. पण पहिलं नातं हे साधारण 17व्या वर्षी झालं. तेव्हा ती चंदीगढमध्ये होती आणि ती एका मित्राबरोबर गेली असता तिची ओळख एका व्यक्तीशी झाली. तो एक क्यूटसा पंजाबी माणूस होता. त्यावेळी त्याचं वय मात्र 28 होतं. मला तो जेव्हा बच्चा म्हणाला तेव्हा माझं मन दुखावलं गेलं होतं. खरं तर आम्ही एकमेकांना डेट केलं पण त्याला नंतर कळलं असावं की या खेळात मी खूपच नवी आहे आणि त्यानंतर आमचं ब्रेकअप झालं. 

करण जोहरला करायचंय कंगना रणौतसोबत काम

प्रेमात स्वतःला झोकून देणारी प्रेमिका

याच मुलाखतीमध्ये कंगनाने आपण कशी प्रेमिका आहोत याचाही खुलासा केला. कंगना म्हणाली, ‘मी स्वतःला प्रेमात झोकून देणारी प्रेमिका आहे. आपल्या पहिल्या ब्रेकअपच्या वेळीदेखील या नात्याला अजून एक संधी द्यावी असं मी सांगितलं होतं. मला तर किसदेखील करता येत नव्हतं. नेहमी मी स्वतःच्या हातावर किस करण्याचा सराव करायचे. माझं पहिलं किस तर अजिबात जादुई असं काहीच नव्हतं. तर खूपच वाईट होतं. किस करताना माझे ओठ तर अगदी चिकटून गेले होते आणि मला काहीच करता येत नव्हतं. कदाचित म्हणूनच माझं ब्रेकअप झालं असावं’ कंगनाने यावेळी आपल्या आयुष्यातल्या प्रेमाच्या काही मजेशीर आठवणीही शेअर केल्या. कंगनाचा लवकरच ‘पंगा’ हा कबड्डीशी संबंधित असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाकडून कंगनाला खूपच अपेक्षा आहेत. नेहमीप्रमाणे यातही कंगनाचा परफॉर्मन्स जबरदस्त असणार याची तिच्या चाहत्यांना खात्री आहे. शिवाय आता कंगना लग्न करणार असल्याची गोड बातमीही या नव्या वर्षात तिने दिली आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच कंगना आणि तिच्या चाहत्यांसाठीही खास असणार. 

कंगना रणौत कशी साकारणार जयललिता यांची भूमिका

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.