आलियावर कंगना पुन्हा बरसली, आलियाच्या अभिनयावर केली टीका

आलियावर कंगना पुन्हा बरसली, आलियाच्या अभिनयावर केली टीका

कंगनाला सध्या झालं तरी काय? अशीच चर्चा हल्ली बी टाऊनमध्ये होत आहे. कारण आलेल्या प्रत्येक दिवशी कंगना कोणावर तरी टीकाच करत आहे. करणसोबत रंगलेला नेपोटिझम वाद, ऋतिकसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअपवरील तिच्या तीव्र प्रतिक्रिया हे करुन भागले नाही तर आता कंगना  बॉलीवूडची लव्हीडव्ही आलियावर घसरु लागली आहे. म्हणजे तिने आधीही आलियावर टीका केली होती. पण आता तिने आलियाला लक्ष्य करायचे फायनल केले आहे. कारण टीकेचा आणखी एक प्रहार कंगनाने आलियावर केला आहे. Gully boy मध्ये आलियाने काय असे काम केले आहे की, तिच्या अभिनयाची इतकी चर्चा व्हावी. आलियाच्या अभिनयावर टीका करत कंगनाने पुन्हा एकदा तिच्यावर शरसंधान साधले आहे.


आंटी म्हणणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर


आलियाचा अभिनय एकदम टुकार


'स्टुडंड ऑफ द इयर'पासून करिअरची सुरुवात केलेल्या आलियाचे करिअर आता चांगले सुस्साट सुरु आहे. तिच्या अभिनय कौशल्यातही वाढ झाली आहे. वेगळ्या धाटणीचे चित्रपट ती हल्ली करत आहे. नुकताच तिचा gully boy हा चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. रणवीर सिंहचा अभिनय तर कमाल होताच. पण आलिया यात एका पझेसिव्ह गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली आणि तिने त्या कॅरेक्टरला पुरेपूर न्याय देखील दिला. तिच्या अभियाचे सर्वत्र कौतुक होत असताना कंगना मात्र आलियाचा अभिनय gully boyमध्ये अगदीच सर्वसाधारण असल्याचे म्हणाली आहे. तिच्या अभिनयाची इतकी तारीफ करण्याची गरज काय? इतकेच नाही तर कंगना पुढे  म्हणाली की, बॉलीवूडच्या लोकांचे स्टार किडवर खूप प्रेम आहे. आलियाच्या बाबतीतही तसेच आहे. तिच्यात काहीच वेगळे नसताना तिला फार उगाच वरच्या स्थानावर जाऊन पोहोचवले आहे. चुकीच्या कामाचे उगाच कौतुक करु नका त्यामुळे अभिनयाचा दर्जा पुढील काळात कधीच वाढणार नाही, असे म्हणत कंगनाने आता नवा वाद ओढावून घेतला आहे.


सुव्रत-सखी अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो

कंगनाचा आलियावर का आहे राग?


आलियावर कंगनाने आधीही निशाना साधला आहे आणि ती एकटीच स्टार किड काम बॉलीवूडमध्ये काम करत नाही. पण तिच्या निशाण्यावर कायम आलिया जरा जास्त आहे. कारण या आधी तिने आलियाला करण जोहरच्या हातातील कटपुतली असे म्हटले होते.त्यानंतर आलियाचा बॉयफ्रेंड रणबीरला राजकारणासंदर्भात काहीच बोलणार नाही यावरुन टार्गेट केले होते आणि आता आलियाचा अभिनयाला तिच्या अभियासाठी पुरस्कार मिळवूनही आलिया अभिनयात किती कच्ची आहे. हे लोकांना सांगत तिच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आलियावर टीका झाल्यानंत तिने यावर न बोलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने कंगनाची माफी देखील मागितली. पण कंगनाने आलियाला इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्याचा अट्टहासच घेतला आहे जणू. 


वरुण धवनच्या गर्लफ्रेंडला आली विचित्र धमकी

 कंगनाच्या मणिकर्णिकावरही झाली टीका


कंगनाचा नुकताच झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत मणिकर्णिका नावाचा चित्रपट केला. पण त्यात तिचा अभिनय फार चांगला होता अशी प्रतिक्रिया आली नाही. उलट तिच्या अभिनयावर लोकांनी टीकाच केली. तिला झाशीच्या राणीचा तो करारीपणा जमलाच नाही अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यपणे उमटली.त्यामुळे आता कंगनाने स्वत:चा अभिनय सुधारावा आणि मग दुसऱ्यांचा अभिनय पाहावा अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.


(सौजन्य-Instagram)