बॉलीवूडमध्ये एखाद्याची करिअरची गाडी रूळावर आली की, ती सुसाट धावलीच म्हणून समजा. खूप कमी बॉलीवूड स्टार्स आहेत ज्यांना अशी संधी मिळते. अशी लकी फेज सध्या अभिनेत्री कियारा अडवाणीच्या बी-टाऊन करिअरमध्ये आली आहे. कियारा अडवाणी आठवली का….तीच ती जिचा लस्ट स्टोरीजमधला ‘तो’ बोल्ड व्हायब्रेटर सीन व्हायरल झाला होता. बऱ्याच स्ट्रगल आणि छोट्या मोठ्या भूमिकानंतर आता कियाराच्या करिअरची गाडी चांगलीच रूळावर आली आहे, म्हणायला हरकत नाही. पण तिच्या या आनंदावर लगेचच विरजण पडलंय.
नुकतंच कियाराने तिचा नवा चित्रपट 'इंदू की जवानी'बद्दल इन्स्टावर अपडेट केलं होतं. त्यावरून आता वादाला सुरूवात झाली आहे.
How can a film be called Indu ki Jawani? On one hand we talk about woman empowerment and on other hand we present them like toys ....(contd) https://t.co/vVdHY4XDCF
— Rangoli Chandel (@Rangoli_A) May 27, 2019
काहीवेळा एखाद्या गोष्टीला नजर लागते. कारण कियाराने चित्रपटाबाबत घोषणा करताच कंगना रणौतची बहीण रंगोलीने या चित्रपटाच्या नावावर टीका केली आहे. रंगोलीने याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, एखाद्या चित्रपटाचं नाव तुम्ही इंदू की जवानी असं कसं ठेवू शकता. एकीकडे आपण वुमन इम्पॉवरमेंटच्या गप्पा मारतो तर दुसरीकडे तिला खेळणं असल्यासारखं समाजासमोर मांडतो. असं रंगोलीने म्हटलं आहे. रंगोलीने अशी टीका करायची पहिलीच वेळ नाही.
खरंच महेश भटने कंगनावर फेकली होती का चप्पल
कियारा अडवाणी 'इंदु की जवानी' या तिच्या आगामी सिनेमाबाबत फारच उत्साहीत आहे. कारण कियाराचा हा पहिला वुमन सेंट्रीक सिनेमा आहे. सध्या कियारा या भूमिकेसाठी सुरू असलेल्या वर्कशॉपमध्ये बिझी आहे. कियाराच्या करिअरमधील ही सर्वात निर्णायक भूमिका म्हणायला हरकत नाही. 'इंदू कि जवानी' मध्ये या चित्रपटाची कथा एका छोट्या शहरातली मुलगी इंदूभोवती फिरते. या चित्रपटात कियारा एका अशा मुलीची भूमिका करत आहे जिच्याकडून डेटींग अॅप वापरताना होतात काही चुका आणि मग सुरू होते खरी धमाल. या चित्रपटातून पहिल्यांदाच बंगाली लेखक-दिग्दर्शक आबिर सेनगुप्ता मोठ्या पडद्यावर डेब्यूवर करणार आहे. सध्या कियारा शेरशाह च्या शूटींगमध्ये बिझी आहे. त्यानंतर या सिनेमाच्या शूटींगला सुरूवात होईल.
आधीच म्हटल्याप्रमाणे कियाराच्या करिअरने आता चांगलाच वेध घेतला आहे. कलंकमध्ये छोट्या भूमिकेत दिसलेली कियारा आता मात्र मुख्य भूमिकांमध्ये झळकत आहे. लवकरच कियाराचा शाहीद कपूरसोबतच ‘कबीर सिंह’ हा चित्रपट, अक्षय कुमार, करिना कपूर-खान आणि दिलजीत दोसांजसोबतचा ‘गुड न्यूज’, त्यानंतर ‘शेरशाह’ आणि दाक्षिणात्य सिनेमा कंचनाचा अक्षयकुमारसोबतचा रिमेक ‘लक्ष्मीबॉम्ब’ हे सिनेमाही रिलीजसाठी तयार आहे.
कियारा म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो लस्ट स्टोरीजमधला तो बोल्ड व्हायब्रेटर सीन. ज्याची बी-टाऊन आणि एकूणच फारच चर्चा रंगली होती. कियाराने हा सीन आपल्या आजीला ही दाखवल्याचं एका चॅट शो मध्ये सांगितलं. कियाराची आजी अँग्लो इंडियन असल्यामुळे त्यांना हा सिनेमा कळत नव्हता. मात्र सबटायटल्स वाचून त्या समजायचा प्रयत्न करत होत्या. पण कियाराचा हा सीन पाहून तिच्या आजीने काहीच रिएक्ट केलं नाही.