संजय राऊतच्या वादग्रस्त विधानावर कंगनाने दिले असे उत्तर

संजय राऊतच्या वादग्रस्त विधानावर कंगनाने दिले असे उत्तर

देशात आलेला कोरोना, सुशांस सिंह राजपूतची आत्महत्या, लॉकडाऊन.. त्यामुळे आलेले नैराश्य या सगळ्या गोष्टी असताना आता राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे.शिवसनेचे संजय राऊत यांनी कंगनासाठी वापरलेला ‘हरामखोर मुलगी’ हा शब्द तिच्या चांगलाच मर्मावर बसला आहे. यासाठी तिने आता आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ ट्विट करत तिने अभिनव्यक्ति स्वातंत्राचा उल्लेख करत ‘मी मुक्त आहे’ असे म्हटले आहे. आता हे नेमके प्रकरण काय ते देखील जाणून घेऊया.

रसोडे मे कौन था' मीम्स सरकारलाही भावले, असा केला वापर

अशी झाली सुरुवात

कंगनाचे गेले कित्येक दिवस वादातित व्हिडिओ येत आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या अनेक गोष्टींचा ती समाचार घेत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये तिने ड्रग्जचे असलेले कनेक्शन आणि पोलिसांसंदर्भात असलेली नाराजी व्यक्त केली.शिवाय तिने मुंभईची तुलना पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीससोबत करत मुंबई पोलिसांची भीती वाटते, अशा संदर्भातील केलेले हे विधान अनेकांना खटकले. सोशल मीडियावर तिला अनेकांनी चांगलेच खडेबोल सुनावले. शिवसेनेच्या संजय राऊतांनी तिच्याबद्दल ‘हरामखोर मुलगी’ हा शब्दप्रयोग केला. त्यानंतर चिडलेल्या अनेक शिवसैनिंकांनी तिला मुंबईत पाय ठेवून दाखव अशी धमकी दिली. त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली  आणि आता कंगनाने या संजय राऊतांच्या या विधानावर आपले उत्तर कंगनाने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे. 

9 सप्टेंबरला मुंबईत येईन- कंगना

कंगना रणौतने एक नवा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी केलेला हरामखोर शब्दाचा प्रयोग हा एका मुलीसाठी चुकीचा आहे असे ती म्हणाली आहे. अशाच शब्दप्रयोगामुळे समाजात महिलांसोबत वाईट कृत्य करण्यासाठी धजावतात. म्हणूनच महिलांवर अशाप्रकारे अत्याचार केले जातात. ही अशीच पुरुषी वृत्ती समाजासाठी घातक आहे. अशा पद्धतीने समजात महिलांविषयी घातक विधान करणाऱ्यांना भारताच्या मुली कधीही सोडणार नाहीत. त्या नक्कीच याचा विचार करतील. पुढे ती म्हणाली, देशासंदर्भात भीती व्यक्त करणारी मी एकटी व्यक्ति नाही. या आधी नसीरुद्दीन शाहा, आमीर खान यांनीही देशाविरोधी अशाप्रकारचे गैरशब्द वापरले त्यावेळी संजय राऊत कुठे होते? त्यावेळी त्यांनी या लोकांसाठी संजय राऊत यांनी या शब्दाचा प्रयोग का नाही केला? त्यांना या संदर्भात का काही बोलण्यात आले नाही. 

PUBG मधून झाली अनेकांची सुटका, ट्विटरवर मीम्सचा पाऊस

मुंबई पोलीसांच्या बाजूने कायम

कंगनाने पुढे म्हणाली की, मुंबई पोलिसांचा मला किती अभिमान होता याचा विसर जर कोणाला पडला असेल तर त्यांनी माझे जुने व्हिडिओ नक्की पाहावे. कारण मुंबई पोलिसांविषयी माझ्यापेक्षा जास्त अभिमान कोणालाच नाही असे मला वाटते. शिवसेनेकडून मुंबईत पाय तरी ठेवून दाखव अशा पद्धतीच्या धमक्या मला देण्यात येत आहे. मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर मग मुंबईत येऊ नकोस असे सांगणाऱ्यांना तिने सांगितले आहे की, मी मुंबईत 9 सप्टेंबरला येणार आहे. मी मुक्त आहे. मी कुठेही जाऊ येऊ शकते. 


आता वातावरण तापलेले असताना कंगनाचे असे मुंबईत येणे आणखी कोणता नवा गोंधळ उडवणार आहे. यासाठी थोडे थांबावे लागेल.

आई झाल्यावर या अभिनेत्रींनी केला बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक