‘धाकड’ चित्रपटाच्या कामाला कंगनाने अशी केली सुरुवात

‘धाकड’ चित्रपटाच्या कामाला कंगनाने अशी केली सुरुवात

इतक्या सगळ्या कॉन्ट्राव्हर्सीज झाल्यानंतर आता कंगनाने थोडा ब्रेक घेत कामासाठी पुनश्च हरीओम करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसमुळे थंडावलेल्या सगळ्या शूटिंगच्या कामांना आता परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काळजी घेत या शूटिंग सुरु झाल्या आहेत. कंगनानेही त्यामुळे तिच्या मेगा प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली आहे. 2020मध्ये तिच्या हाती दोन मोठे चित्रपट असल्याचे कळत होते. त्यापैकी ‘धाकड’ या चित्रपटाच्या कामाला तिने सुरुवात केली आहे. पण र्व्हच्युअली. हो तिने तिच्या कामाला घरीच राहून सुरुवात केली आहे. तिने नेमकी कामाची सुरुवात कशी केली ते जाणून घेऊया.

अजून एका अभिनेत्रीचे निधन, 29 व्या वर्षीच कॅन्सरमुळे गमावले प्राण

असे झाले स्क्रिप्ट रिडिंग

लॉकडाऊन आधी कंगना रणौत ‘धाकड’ ने धाकड चित्रपटाची घोषणा केली होती. स्त्री भूमिका केंद्रस्थानी घेऊन धाकड हा चित्रपट लिहिला गेला आहे. या चित्रपटाचे लेखक रजनीश राजेश घई यांनी या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहून पुरी केली आहे. पण लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचन किंवा बाकी सगळ्या गोष्टी राहून गेल्या होत्या. त्यामुळेच या चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचन करुन घेण्यासाठी कंगना आणि रजनीश यांनी व्हिडिओ कॉलचा आधार घेतला. या व्हिडिओ कॉलचे फोटो तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहेत. त्यामुळे तिने तिच्या कामाचा श्रीगणेशा अशा पद्धतीने केला आहे. 

धाकड असणार जबरदस्त अॅक्शनपट

Instagra

कंगना रणौतला अॅक्शनपटात या आधीही पाहिले आहे. क्रिशमध्ये तिने साकारलेली विलनची भूमिका तर आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर ती पूर्ण अॅक्शनमध्ये दिसली ती पंगा या चित्रपटात आणि आता ती सज्ज झाली आहे धाकडसाठी. धाकड हा सुद्धा एक अॅक्शनपट आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाची घोषणा कंगना रणौतने केली आहे

कधी काळी या 5 चित्रपटांना दिला होता ऋतिक रोशनने नकार

धाकडकडून आहे कंगनाला खूप अपेक्षा

धाकड या चित्रपटाविषयी या आधीही कंगनाने बरेचदा सांगितले आहे. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. कंगनाच्या दृष्टिकोनातून हा चित्रपट भारतीय सिनेमा बदलणारा असणार आहे. त्यामुळे त्याची तयारीही जोरदार केली आहे. 

बायोपिकमध्ये दिसणार कंगना

कंगनाकडे आणखी एक मोठा चित्रपट आहे तो म्हणजे थलय्यवी. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत असा हा चित्रपट असून कंगना यामध्ये जयललिता यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. तिचा फर्स्ट लुक आल्यानंतर अनेकांना ही कंगना आहे यावर विश्वास बसला नव्हता. कारण कंगनाला जयललिता यांच्या रुपात पाहून अनेकांना या जयललिलाच आहेत असा भास झाला. 

कंगना आणि कॉन्ट्राव्हर्सीज

कंगना चित्रपटांमधून दिमाखदार काम करत असली तरी तिच्या कॉन्ट्राव्हर्सीज काही कमी नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तिने नोपोटिझम वादाला पुन्हा एकदा सुरुवात केली. तिच्यामुळे अनेकांनी नेपोटिझमवर पुन्हा एकदा टीका केली तर काही सेलिब्रिटींनी कंगनालाच लक्ष्य केले. बॉलीवूडमध्ये काही हालचाली झाल्या की, कंगना त्यावर अगदी हमखास बोलतेच. तिचे बोलणे नेहमीच कॉन्ट्राव्हर्सी करुन जाते. 


पण आता ‘धाकड’च्या कामाला कंगना लागल्यामुळे तिनेही हा वाद थोडा बाजूलाच ठेवला असावा

इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर