कंगनाच्या रडारवर रणबीर कपूर,राजकारणावरुन दिला टोमणा

कंगनाच्या रडारवर रणबीर कपूर,राजकारणावरुन दिला टोमणा

ऋतिक प्रकरणानंतर कंगना चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. तिच्या त्या प्रकरणापेक्षाही तिच्या वादग्रस्त विधानामुळे ती नेहमी चर्चेत राहिली आहे. करण जोहरसोबतचा नेपोटिझमवरुन रंगलेला वाद असू दे किंवा बॉलीवूडच्या इतर सेलिब्रिटींशी ती घेत असलेला पंगा असू दे तिच्या अशा वागण्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. सध्या कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यंदा निशाण्यावर ऋतिक, करण किंवा आलिया असे कोणी नाही तर आता तिच्या रडारवर आला आहे कपूरांचा रणबीर… देशाने दिलेल्या मर्सिडीज गाडीत बसतो पण देशाच्या राजकारणावर बोलायला पाहात नाही यात काय अर्थ आहे, असा टोमणा कंगनाने रणबीरला दिला आहे.


सलमानच्या सांगण्यावरुन सिद्धू परतणार कपिल शर्मा शोमध्ये?


kangana ranbir


नेमकं प्रकरण काय?


नुकताच कंगना रनौतचा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी नावाचा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी आलेल्या कंगनाला ज्यावेळी माध्यमांनी काही प्रश्न केले तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे राजकारणविषयी बोलणे टाळतात.आम्ही काय केले आहे ? आम्हाला राजकारणावर प्रश्न का?असे उत्तर देतात. पण तुम्ही देशाचे जबाबदार नागरीक असले पाहिजे. कंगनाच्या या उत्तरानंतर ती नेमका हा टोमणा कोणाला देत आहे हे कळत नव्हते. पण काही दिवसांपूर्वी रणबीरला राजकारणाविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्याने ‘माझ्या घरी पाणी, वीज सगळे काही आहे मग मी राजकारणावर का बोलू?’ असे विधान केले होते. त्यावर कंगनाने त्याला उत्तर देत तू या देशाचा नागरिक आहेस, तू ज्या मर्सिडीज गाडीतून फिरतोस ती तुला देशाने दिलेली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणविषयी तू बोलायलाच हवे. मी चित्रपटात काम करतो राजकारणाविषयी कसे काय बोलू ? असे तुम्ही म्हणू शकत नाही, असे कंगनाने अप्रत्यक्षपणे कंगनाने रणबीरला सुनावले.


वाढतं वय लपवण्यासाठी वाचा या अँटीएजिंक टीप्स

पिकला हशा


कंगना कोणाला बोलत आहे ? हे बराच वेळ कळत नसल्यामुळे उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिल्लीमध्ये झालेल्या मणिकर्णिकाच्या सक्सेस पार्टीला इतर स्टारही हजर होते. यावेळी झलकारीबाईची भूमिका साकारलेली अंकिता लोखंडेही उपस्थित होती. कंगनाच्या या विधानानंतर तिला भर कार्यक्रमात हसू आवरले नाही. ती तिचे हसू आवरत असतानाचा हा तो व्हिडिओ आता अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या आधीही अंकिताला चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने डावलल्याच्या चर्चा होत होत्या.


पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक भारतीयांना असे काही म्हणाली की, झाली ट्रोल


कंगना उतरणार राजकारणात?


रणबीरला टोमणा देता देता कंगना राजकारणावर इतके काही बोलत होती की, ती स्वत:च राजकारणात प्रवेश करणार की काय? अशी शंकाच येऊ लागली. तिचा याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आल्यानंतर या चर्चांना खऱ्या अर्थाने उधाण आले.


manikarnika kangana


कंगना लवकरच होणार ‘मेंटल’


मणिकर्णिकानंतर आता कंगना लवकरच मेंटल होणार आहेत अशी काहीशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण राजकुमार रावसोबत ती पुढील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव मेंटल असे असणार आहे.त्यामुळे आता या चित्रपटादरम्यान कंगना नेमका काय गोंधळ घालते ते पाहायला हवे.शिवाय ही नवी जोडी असल्यामुळे चित्रपट कसा असणार अशी उत्सुकताही अनेकांना आहे. 


(फोटो सौजन्य- Instagram)