मणिकर्णिकामध्ये कंगना साकारतेय राणी लक्ष्मीबाईंची ‘ही’ विविध रुपं

मणिकर्णिकामध्ये कंगना साकारतेय राणी लक्ष्मीबाईंची ‘ही’ विविध रुपं

कंगना रणौतचा मणिकर्णिका हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 25 जानेवारीला मणिकर्णिका प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं पोस्टर, भव्यदिव्य ट्रेलर आणि विजयी भव गाणं अशा अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. या चित्रपटाचे सेट्स आणि लोकेशनमधून 18 व्या शतकातील काळ उभा करण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. कंगना रणौतचे या चित्रपटातील लुकदेखील सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. कंगनाने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. कंगना सध्या मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील कंगना राजेशाही भरजरी साड्या आणि पारंपरिक आभूषणांच्या वेशभूषेमध्ये जात आहे.


kangana paithani


kangana


राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारण्यासाठी विशेष महेनत


राणी लक्ष्मीबाई साकारण्यासाठी कंगनाने विशेेष मेहनत घेतली आहे. युद्धकौशल्यामध्ये पारंगत होण्यापासून ते अगदी लुकसाठी देखील फार मेहनत घेण्यात आली आहे. कंगनाचे या चित्रपटातील कपडे, दागिने, मेकअप, हेअर स्टाईल या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन नऊवारी साडी, नथ, पारंपरीक आभूषणे यामधील कंगनाचे लुक सध्या अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. या चित्रपटातील कंगनाच्या लुकसाठी लोकप्रिय ड्रेस डिझाईनर नीता लुल्ला यांनी ड्रेस डिझाईन केलं आहे. मनू, झाशीची राणी ते युद्धभूमीतील वीरांगना हे परिवर्तन या लुकमधून प्रेक्षकांना दिसणार आहे. कंगनासाठी अभिनय आणि ऐतिहासिक लुक यातून झाशीच्या राणीचे धाडसी रुप रुपेरी पडद्यावर साकारणं खरंच खूप आव्हानात्मक असणार. आत्तापर्यत शेअर करण्यात आलेले कंगनाचे हे विविध लुक या साऱ्यांच्या मेहनतीचं दर्शन घडवत आहेत.


मनूचा किशोरवयातील लुक


लग्नाआधीचा राणी लक्ष्मीबाईंचा लुक अगदी साधा आणि मनूच्या भूमिकेला साजेसा ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अगदी कमीतकमी दागिने आणि हलक्या रंगाचे कपडे वापरण्यात आले आहेत.


kangana young new


 


विवाहानंतरचा राणी लक्ष्मीबाईंच्या लुकमधील बदल


राणी लक्ष्मीबाईंच्या या लुककडे बारकाईने पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की या लुकसाठीदेखील फार मेहनत घेण्यात आली आहे. राजघराण्यातील स्त्रियांचा घरंदाज लुक यात दाखविण्यात आला आहे. गदड रंगाच्या भरजरी साड्या आणि त्यावर घेण्यात येणारा शेला अगदी राजेशाही वाटत आहे. शिवाय यासाठी कंगनाच्या केशभूषेमध्येदेखील साजेसे बदल करण्यात आले आहेत. या लुकमधील कंगनाने घातलेले पारंपरीक दागिनेदेखील आकर्षक वाटत आहेत. यासाठी अगदी महाराष्ट्रीयन नथीपासून ते अगदी बोरमाळ, पोहेहार अशा पारंपरीक दागिन्यांची निवड करण्यात आली आहे. कंगनाने ज्या भरजरी वजनदार साड्या आणि दागिने घातले आहेत त्यांचे वजन जवळजवळ दहा ते वीस किलो आहे.


kangana in manikarnika


पती निधनानंतरचा राणी लक्ष्मीबाईंचा लुक


राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्या निधनानंतर राणी लक्ष्मीबाईंच्या लुकमध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी अगदी हलक्या रंगाच्या नऊवारी साड्या आणि अगदी मोजकेच दागिने वापरण्यात आले आहेत. मात्र कंगनाच्या डोळ्यातून राणी लक्ष्मीबाईचा राजेशाही थाट आणि करारी बाणा दिसून येत आहे.


kangana manikarnika 123


kangna young


राणी लक्ष्मीबाईंचा योद्ध्याच्या भूमिकेतील लुक


या सर्वांमध्ये राणी लक्ष्मीबाईंची योद्धाची भूमिका फारच लक्षवेधी ठरत आहे. एकतर यासाठी कंगनाने अभिनयावर प्रंचड मेहनत घेतली असणार शिवाय तिचा लुकदेखील या भूमिकेसाठी अगदी हटके करण्यात आला आहे. या लुकमधून राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यगाथेचं दर्शन घडत आहे.


kangana in manikarnika new


अधिक वाचा- वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक आणि ‘पंगा’साठी कंगनाचा कबड्डीशी ‘पंगा’


 


फोटोसौजन्य-  इन्स्टाग्राम