छोट्याशा अफेअरसाठी किती दिवस गळा काढणार - कंगनाचा ऋतिकला सवाल

छोट्याशा अफेअरसाठी किती दिवस गळा काढणार - कंगनाचा ऋतिकला सवाल

कंगना राणौतची टीवटीव आता कोणालाही नवी राहिलेली नाही. रोज काहीतरी ट्विट करून अथवा रोज काहीतरी नवीन करून अथवा कोणाला तरी टारगेट करून त्यावर आपल्या टिप्पणी देणं हे कंगनाचं आता रोजचं रडगाणं झालं आहे. कंगना आणि ऋतिक रोशन वाद हादेखील आता कोणालाही नवा राहिलेला नाही. कंगना आणि ऋतिकने 2016-17 मध्ये एकमेकांवर बरीच चिखलफेक केली होती आणि त्यानंतर ऋतिकने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र आता ही तक्रार मुंबई पोलिसांनी ऋतिक रोशनच्या विनंतीनंतर क्राईम इंटेलिटन्स युनिटकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा कंगनाचा तिळपापड झाला असून आता तर तिने ऋतिकला किती वर्ष एका लहानशा अफेअरवरून रडणार? असा प्रश्न केला आहे. 

बालगंधर्वची जादू पुन्हा स्टेजवर, मराठमोळ्या गायकाचा व्हिडिओ व्हायरल

प्रकरणाचा शोध घेण्यासाठी ऋतिकची आयुक्तांना विनंती

नक्की हे प्रकरण काय होते तर ऋतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्यादरम्यान क्रिश चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर काही वर्षांनी कंगनाने ऋतिकवर आरोप केल्यामुळे या दोघांचे अफेअर आणि ब्रेकअप या दोन्ही गोष्टी सर्वांसमोर उघड झाल्या. कंगनाने आपल्याला मेल आले आहेत असं सांगितल्यानंतर ऋतिकने आपल्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करण्यात आले आहे आणि त्यावरून कंगनाशी संवाद साधण्यात आला आहे अशी तक्रारही ऋतिकने केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यात यावा अशी विनंती ऋतिककडून करण्यात आली आहे. मात्र यासंबंधात कंगनाने पुन्हा एकदा आपली जिव्हा तलवार उपसून ऋतिकला रड्या असेही म्हटले आहे. 

नेहा कक्करने फोर्ब्सच्या लिस्टमध्ये मारली बाजी,अनेक सुपरस्टार्स राहिले मागे

किती दिवस गळा काढणार - कंगनाचा सवाल

यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाने गरळ ओकली आहे, ‘आता पुन्हा ऋतिकने विचित्रपणा सुरू केला आहे. आमचं ब्रेकअप झालं, त्याचा घटस्फोटही झाला. तरीही किती वर्ष एकच गोष्ट धरून बसला आहे. या सगळ्या गोष्टी त्याला सोडून द्यायच्याच नाहीत. कोणत्याही महिलेला डेट करायलाही नकार देतो. माझ्या व्यक्तीगत आयुष्यात मी पुढे जायचा प्रयत्न करत आहे आणि पुन्हा याची नाटकं सुरू होतात. अरे ऋतिक एका छोट्याशा अफेअरसाठी किती दिवस तू अजून गळा काढणार आहेस?’ असे ट्विट कंगनाने केले आहे. मात्र यावर ऋतिकने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ऋतिकने या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी केवळ पोलिसांना विनंती केली असल्याचे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. कंगना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून आतापर्यंत ऋतिक रोशनला बोलत आली आहे. मात्र ऋतिकने कधीही तिच्याविरोधात सभ्यता सोडून भाष्य केलेले नाही. मात्र आपण तिच्यासह नात्यात होतो की नाही याचाही खुलासा कधी ऋतिकने केला नाही. दरम्यान या सगळ्यामध्ये ऋतिकची पत्नी सुझान खान कायम त्याच्यासह उभी राहिली असून आपला घटस्फोट या कारणाने झाला नाही हेदेखील तिने स्पष्ट केले होते. इतकं असूनही सुझान नेहमीच ऋतिकसह दिसून येते.

कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या वेटलॉसवर कपिल शर्माने केली ही कमेंट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक