कपिल शर्मा आणि गिन्नीच्या बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कपिल शर्मा आणि गिन्नीच्या बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कॉमेडी स्टार ‘कपिल शर्मा’ लवकरच बाबा होणार आहे.  डिसेंबरमध्ये कपिल  आणि गिन्नी आई-बाबा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठीच गिन्नीसोबत वेळ घालवण्यासाठी कपिल सध्या एका छोट्या ब्रेकवर आहे. कपिल आणि गिन्नी कॅनडामध्ये सध्या त्यांच्या बेबीमूनचा आनंद घेत आहेत. कपिलने नुकताच कॅनडामधील त्याचा आणि गिन्नीचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामधून त्या दोघांचं एकमेंकावरील प्रेम दिसून येत आहे. एकमेकांच्या हातात हात घालून ते दोघं सध्या त्यांच्या बेबीमून एन्जॉय करत आहेत. या फोटोसोबत कपिलने एक रोमॅंटिक कॅप्शनदेखील दिली आहे. कपिलने शेअर केलं आहे, “ या सुंदर जगात फक्त तू आणि मी ”

कपिल शर्मा होणार लवकरच बाबा

कपिलने 12 डिसेंबर 2008 रोजी त्याची बालमैत्रीण गिन्नी चतरथ हिच्याशी विवाह केला  कपिलचे लग्न हे बी टाऊनसाठी एक सोहळाच होता. त्याच्या लग्नसोहळ्यालाही बी टाऊनमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामुळे कपिलचे लग्न अगदी धुमधडाक्यात झालं होते. कपिल शर्मा या शोमुळे कपिल सर्वसामान्य जनतेच्या घरात पोहचला आहे. त्याच्या खुमासदार शैली आणि कॉमेडी सेन्समुळे त्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे चाहत्यांना आता कपिलला खऱ्या बाबाच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता लागली आहे.  

Instagram

कपिलच्या जीवनातील अप एन्ड डाऊन्स

कपिल शर्मा हा टेलिव्हिजन माध्यमातील एक जबरदस्त स्टार आहे. 'The Kapil sharma show' च्या माध्यमातून त्याने अनेक चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लंडन बुक ऑफ रेकॉर्डच्या मते 'दी कपिल शर्मा शो' जगभरात पाहिला जाणारा एक लोकप्रिय शो आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी कपिलच्या जीवनात मोठं वादळ आलं होतं. कपिल आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. ज्यामुळे सुनिल ग्रोव्हरला कपिलच्या शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर कपिलच्या शोचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर घसरला होता. ज्यामुळे निर्मात्यांना शो बंद करावा लागला होता. या शो व्यतिरिक्त कपिलचे वादग्रस्त ट्विटही त्याच्यासाठी त्रासदायक ठरले. या सगळ्यानंतर तो पुन्हा कमबॅक करु शकेल अशी शक्यताही वाटत नव्हती. त्याचा कॉमेडी नाईट विथ कपिल हा शो पुन्हा सुरु झाला पण काही कारणांमुळे तो पुन्हा बंद झाला. ज्यामुळे कपिल तणावाखाली गेला. त्या काळात तो मानसिक ताणाखालीच वागत होता होता. त्याची ती अवस्था पाहून त्याचे फॅनही बिथरले होते. हा शो परत सुरु होणार की नाही अशी अनेकांना शंका होती. पण कपिलने आता कमबॅक केलं आहे आणि सर्व काही पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. आता त्याचं लग्नही झालंय आणि तो लवकरच बाबा होणार आहे. ज्यामुळे तो त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदी असल्याचं दिसून येत आहे. सध्या कपिल त्याच्या पत्नीसोबत कॅनडामध्ये वेकेशनवर आहे. हा काळ प्रत्येक जोडप्यासाठी खूपच खास असतो. लवकरच कपिल आणि गिन्नीच्या जीवनातील आनंद नव्या पाहुण्याच्या आगमनाने द्विगुणित व्हावा हिच ईच्छा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा

सारा अली खानच्या वागणुकीवर ऋषी कपूर खूश,सोशल मीडियावर केली स्तुती

सलमान खानने दिला कपिल शर्माला ‘हा’ सल्ला

हिना पांचाळच्या ‘दिलखेचक अदा’ तुम्ही पाहिल्यात का

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम