कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या वेटलॉसवर कपिल शर्माने केली ही कमेंट

कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या वेटलॉसवर कपिल शर्माने केली ही कमेंट

इंडस्ट्रीमध्ये वजनदार व्यक्तींची काही कमी नाही. वजनदार व्यक्ती या हुद्याने नाही तर वजनाने देखील आहेत.वजनाने आणि हुद्याने वजनदार असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कोरिओग्राफर गणेश आचार्य. वजन असूनही उत्तम नाचणाऱ्या गणेश आचार्याने त्याचे तब्बल 92 किलो वजन कमी केले आहे. इतरेवेळी सगळ्या सेलिब्रिटींना आपल्या पायावर नाचवणारा गणेश आचार्य वेटलॉस करण्यासाठी स्वत:च फिटनेस ट्रेनरच्या तालावर इतका नाचला हे की, त्याच्यामध्ये हा बदल दिसून आला आहे. त्याने सोशल मीडियावर त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन टाकलेले आहे. पण आता पुन्हा एकदा त्याच्या या वजनाच्या जर्नीचा आढावा कपिल शर्मा त्याच्या शोमध्ये कॉमेडीत घेणार आहे. कपिल शर्माच्या शोमधील एक क्लीप सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे

वजनावर केली कपिलने कमेंट

कपिल शर्माच्या शोमध्ये कोरिओग्राफरची फळी येणार आहे.  गीता कपूर, टेरेंस लुईस आणि गणेश आचार्य येणार आहे. गणेश आचार्य या शोमध्ये आल्यानंतर त्याच्यातील बदल पाहून अनेकांना धक्का बसला. कपिल शर्माने त्याला पाहिल्यानंतर किती किलो वजन कमी केले? असा प्रश्न विचारला त्यावेळी त्याने  98 किलो असे सांगितले. त्यावर कपिलने त्या हिशोबाने 2 माणसांचे वजन कमी केले आहे,  असे म्हणत त्याने विनोद केला. गीता कपूर, टेरेंस हे देखील या फ्रेममध्ये दिसत आहे. हा एपिसोड त्यामुळे रंगतदार असणार आहे. 

धमाल असणार कपिल शर्माचा एपिसोड

कपिल शर्माच्या शोमध्ये कोरिओग्राफर्सची ही फळी येणार आहे. हे तर या ट्रेलरमधून नक्कीच कळले असेल. या ट्रेलरवरुन हा धमाल एपिसोड कसा रंगणार आहे याचा अंदाज येत आहे. सगळ्यांचीच लाडकी गीता कपूर या कार्यक्रमात दिसत आहे. गीता कपूर ही नेहमीच धमाल करते हे या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. कृष्णा अभिषेक या एपिसोडमध्ये जॅकी श्रॉफची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यामुळे यामध्ये खूप जास्त मजा येणार आहे.

गीता कपूरसोबत केले फ्लर्ट

कपिल शर्मा आलेल्या सगळ्या सुंदर मुलींसोबत फ्लर्ट करतो. गीता कपूरसोबतही तो यामध्ये फ्लर्ट करताना दिसत आहे. हे हेल्दी फ्लर्ट आणि त्यातून होणारे विनोद हे पाहण्यासारखे आहेत. त्यामुळे गीता कपूरचा एक वेगळा अंदाज यामध्ये पाहायला मिळणार आहे. 

लवकरच येणार लल्ली

ड्रग्ज प्रकरणात अडकलेली भारती सिंह म्हणजे लल्ली…. या शोमध्ये लवकरच परत येणार आहे. नुकतीच तिला या प्रकरणातून सुटका मिळाली आहे. ती या नव्या शोमध्ये दिसत नाही. पण पुढीला काही एपिसोडमध्ये ती नक्कीच दिसेल अशी फॅन्सना अपेक्षा आहे. नुकतीच कपिल शर्माच्या घरी जाताना दिसली आहे.  तिला अनेक पापाराझींनी कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. त्यामुळे या शोमध्ये विनोदाची आणखी खुमासदार फोडणी  लावलेली पाहायला मिळणार आहे. 


सध्या जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर गणेश आचार्यचे ट्रान्सफॉर्मेशन नक्की पाहा.