कपिल शर्माची मुलगी दिसतेय खूपच क्युट, नवे फोटो व्हायरल

कपिल शर्माची मुलगी दिसतेय खूपच क्युट, नवे फोटो व्हायरल

कॉमेडी क्वीन कपिल शर्मा बाबा झाल्यापासूनच फार बिझी झाला आहे. मुलीला वेळ देता यावा म्हणून तो अनेकदा आपल्या मुलीला सेटवर घेऊन येतो. कपिलच्या या चिमुकलीचे काही नवे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये अनायरा इतकी क्युट दिसत आहे की, तिचे हे फोटो कपिलसच्या फॅन्सना खूपच आवडले आहेत. त्यांनी या क्युट अनायराला अगदी डोक्यावर घेतले आहे. आता आम्हीच कशाला तुम्हीच कपिलच्या मुलीचे फोटो पाहिल्यानंतर हे नक्कीच म्हणाल हा आम्हाला विश्वास आहे. पाहा अनायराचे हे क्युट फोटोज

अमेय खोपकर एंटरटेन्मेंटने केलं उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

रिया तिवारीने केले फोटो शेअर

Instagram

अनारायचा फोटो रिया तिवारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. रियाने अनायरला उचलून घेतले आहे. अनायराने या फोटोमध्ये चेक्सचा टॉप घातला आहे.  गुलाबी रंगाची टाईट्स घातली आहे. यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे. रिया तिवारीने हा फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनसुद्धा लिहिली आहे. ‘माझी लाडकी अनायरा, तुला खूप शुभेच्छा.कपिल आणि गिन्नी वहिनीला खूप शुभेच्छा’ असे म्हटले आहे. रियाच्या या फोटोवर सगळ्यांनी भरभरुन खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 

कोण आहे रिया तिवारी ?

Instagram

कपिलच्या मुलीला घेणारी रिया तिवारी आहे तरी कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला. अनेकांनी त्यांचे गुगलवरही सर्च केले असेल. रिया तिवारी ही कपिल शर्माची नेमकी नात्याने कोण आहे हे नक्की माहीत नाही. पण ती त्याला भाऊ मानते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कपिल शर्मासोबतचे फोटोसुद्धा आहेत. रिया तिवारी ही कपिल शर्माच्या बहिणीसारखी असून ती अनेकदा कपिल शर्माच्या सेटवरसुद्धा येऊन गेली आहे.त्यामुळे आता रिया तिवारी कोण हे तुम्हाला कळलं असेलच

सैफ आणि अजयच्या वादावर काजोलने केला खुलासा

अनायरा अनेकदा असते सेटवर

Instagram

कपिल काहीच महिन्यांपूर्वी बाबा झाला. त्याने गिन्नी आणि बाळाचे फोटो आधीही शेअर केले होते. बाळाचे नाव अनायरा ठेवल्यानंतर त्याने या नावाचा उलगडाही केला होता. कपिल आपला जास्त वेळ अनायरासोबत आणि गिन्नीसोबत घालवण्यासाठी त्यांना सेटवर घेऊन येतो. त्यामुळे अनेकदा सेटवर अनायराला कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आले आहे.

कपिल शर्माचा तो काळ होता बॅड पॅच

प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो ज्यावेळी तो सगळं काही हरवून बसतो.कपिलच्य बाबतीतही असे झाले होते. प्रसिद्धीची हवा त्याच्या डोक्यात गेली होती. त्याने सेटवर उशीरा पोहोचणे आणि दुसऱ्या काही कॉन्ट्राव्हर्सीज करायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याचा शोही बंद पडला. या सगळ्या प्रकरणामुळे तो मानसिक तणावाखाली होता.त्याचे वजन वजन वाढले. या काळात त्याने लग्नसुद्धा केले. त्यानंतर त्याचे आयुष्य रुळालवर आले. त्याचा शो पुन्हा सुरु झाला. त्यानंतर त्याने त्याच्या चुकांवर काम करायला सुरुवात केली. आता तो पुन्हा एकदा नंबर वन कॉमेडीयन बनला आहे. 


कपिलच्या अनायराचे फोटो पाहिले नसतील तर एकदा नक्की पाहा. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.