कपिल शर्माची सोशल मीडियावर होतेय वाह वाह

कपिल शर्माची सोशल मीडियावर होतेय वाह वाह

मार्च महिन्यापासून सुरु झालेला लॉकडाऊन अद्यापही संपायचे नाव घेत नाही. लॉकडाऊनचा पहिला काळ चांगला वाटला तरी अनेकांना याचा मानसिक ताण यायला लागला आहे. घराबाहेर न पडणाऱ्या अनेकांना आता कोंडल्यासारखे होऊ लागले आहेत. या कोंडमाऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. पण काहींच्या आयुष्यात हरवलेल्या हसूने त्यांना मानसिक ताण आणला. सगळ्यांना भरभरुन हसवणाऱ्या कपिल शर्माच्या कॉमेडी शो मुळे अनेकांचा मानसिक ताण गेला आहे. या लॉकडाऊन दरम्यान कपिलचे जुने एपिसोड पाहून एक महिला तणावमुक्त झाली. तिच्या मुलीनेच कपिल शर्माचे आभार मानले. मग काय कपिल शर्माची वाह वाह तर होणारच ना! नेमकं काय झालं ते वाचा

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

नेमकं काय घडलं?

सध्या लॉकडाऊनमुळे सगळं काही बंद आहे. अनेक जण त्यांचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर सेलिब्रिटी सतत अपडेट ठेवत आहेत. रोजच्या रोज घडणाऱ्या गोष्टींकडे अधिक लक्ष देत आहेत. कपिल शर्माही ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. त्याला एका मुलीने ट्विट केले.ती म्हणाली की, माझी आई सतत तणावाखाली असते. ती मध्येच रडते. मध्येच हसायला सुरुवात करते. तिला एकदा मी तुझ्यासाठी काय करु असे विचारल्यावर ती म्हणाली की, कपिल शर्मा शो लावून दे. तुमचा शो लावल्यानंतर ती खळखळून हसली. तिचा तणाव, तो थकवा अगदी काहीच दिवसात दूर झाला. तुमची मी आभारी आहे. कपिल शर्माने तिच्या फॅनला लगेचच उत्तर दिले. त्याने लिहिले की, त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद कायम असू दे त्या लवकर बऱ्या होतील. तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ त्यांच्यासोबत घालवा. तुमच्या प्रेमाचा मी ऋणी आहे.

सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, मात्र राजीवची आहे एक अट

रिट्विटवर रिट्विट

कपिल शर्माने तिच्या फॅन्सला उत्तर दिल्यानंतर सगळ्यांनीच कपिलची तारीफ केली आहे. कपिलच्या शो मुळे अनेक जण खळखळून हसली आहेत. त्यांनी स्वत:ला दु:खातून बाहेर काढले आहे. त्यामुळे ट्विटरवर तो आता चांगलाच ट्रेंड होत आहे. 

कधी येणार नवे एपिसोड

सध्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. पण कपिल शर्मा  शोचे शूटिंग किंवा त्यांच्या नवा एपिसोड संदर्भात सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. सोशल डिस्टंसिंग पाळत याचे शूटिंग सुरु केले जाईल. आणि लवकरच कपिलचे नवे शो टेलिकास्ट होतील अशी अपेक्षा आहे. 

सगळ्यात जास्त टीआरपी

Instagram

कपिल शर्मा नेहमीच टीआरपीच्या घरात वर राहिला आहे. त्याच्या या नव्या शोनेही चांगला पीकअप घेतला आहे. हा शो काही काळासाठी ऑफएअर गेल्यानंतर लोकांना तो परत कधी येईल असे झाले होते. स्वत: कपिलही त्याचा शो अचानक बंद झाल्यामुळे मानसिक तणावाखाली गेला होता. पण त्याने त्यातून स्वत:ला बाहेर काढले आणि पुन्हा एकदा त्याचा शो पहिल्या क्रमांकावर आणला. 


सध्या कपिलच्या या शोमुळे अनेकांचा मानसिक ताण घालवला आहे. तुम्हालाही एकटे किंवा दु:खी वाटत असेल तर तुम्ही कपिलचा शो नक्की पाहायला हवा.

पानिपत'मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने कोरोना काळात केले लग्न, फोटो व्हायरल