कपिल शर्माने सुनील आणि इतर प्रकरणांवरुन उठवला पडदा

कपिल शर्माने सुनील आणि इतर प्रकरणांवरुन उठवला  पडदा

कपिल शर्माच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट आता बऱ्यापैकी संपले आहे.त्याचा नवा शो देखील सुरु झाला आहे.तो चांगला चालत आहे. मागच्या सगळ्या गोष्टी विसरुन कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्याचे काम करत आहे. पण त्याच्या शोमध्ये सुनील ग्रोवरची कमतरता आजही अनेकांना भासत आहे. त्याला अनेक ठिकाणी सुनीलबाबात प्रश्न विचारले जातात. शिवाय गेल्या वर्षभरात त्याने सोशल मीडियावर माजवलेल्या गोंधळाबाबतही त्याला विचारले जाते. पण एका टॉक शो मध्ये खुल्लमखुल्ला संवाद साधत कपिलने आता मी सुधरलो आहे असे सांगितले आहे.


काय म्हणाला कपिल?


कपिल खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवरसोबतच्या भांडणामुळे..ऑस्ट्रेलियातून परतत असताना या दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर कपिलचा बॅड पॅच सुरु झाला. दारु पिण्याची त्याची सवय वाढली होती. तो सोशल मीडियावर नाहक ट्विट करुन नको त्या विषयावर वाद घालत होता. अरबाजच्या पिंच या टॉक शो मध्ये त्याने याआपली चूक कबुल केली. माझा  वाईट काळ मी मागे टाकत पुढे आलो आहे. मी आता सुधरलोय असे तो म्हणाला.


kapil sharma


घटस्फोटाची चुकीची माहिती देणाऱ्या मासिकाविरोधात प्रियांका-नीक करणार कारवाई


सुनील प्रकरणावर काय म्हणाला कपिल? 


सुनीलने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या भल्यामोठ्या पोस्टवर कपिल शर्माने अगदी स्मित करत उत्तर दिले की, मी या नव्या शोसाठी सुनीलकडे विचारणा केली होती. पण त्याला त्यावर गैरसमज झाला. माझ्या मनात सुनीलबद्दल अजिबात कटुता नाही. उलट तो काय काम करतो हे पाहायला मला नक्की आवडेल. 


सोशल मीडियावर लक्ष देणे केले बंद


मी गेल्या वर्षभरात तणावाखाली येऊन बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. पंतप्रधानांना पत्र लिहिणे असो किंवा महापालिकेला टविट करणे असो या सगळ्यातून लोकांनी मला टार्गेट केले. मी त्यात इतका वाहून गेलो की, फार अर्वाच्च शब्दात लोकांना रिप्लाय दिला. पण माझ्या हातून झालेल्या चुका मी मान्य केल्या आहेत आणि सोशल मीडियावर लोक मला काय म्हणतात याचा विचार करणे सोडून दिले आहे.kapil 1


म्हणून मी त्या पत्रकाराला दिल्या शिव्या


सुनील प्रकरणानंतर कपिलची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत होती. ज्यात कपिल एका पत्रकाराशी असभ्य शब्दात बोलत होता. पत्रकाराला शिव्या देत होता.  त्यावर प्रश्न विचारला असता कपिल म्हणाला की, माझ्या या वाईट काळात माझ्यावर एक व्यक्ती सतत लिहित होता. कोणतीही माहिती नसताना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगून तो वाटेल ते लिहित होता म्हणूनच मी त्याला ते बोललो.

Subscribe to POPxoTV

मलायका मालदीवमध्ये ही करतेय हॉट योगा


बायकोकडे पासवर्ड असेल तर कसली चिंता


आता कपिल शर्मा म्हटल्यावर विनोद तर आलाच या शोमध्ये अरबाज खानने जेव्हा त्याला मोबाईल पासवर्ड बाबत विचारले तेव्हा तो पटकन म्हणाला की, माझ्या फोनचा पासवर्ड माझ्या बायकोकडे आहे त्यामुळे मला कसली भिती नाही, उलट मीच तिला काही फोन आले की, तू बोल असे सांगतो. त्यामुळे त्या बाबतीत मी अगदीच सेफ आहे,असे कपिलने सांगितले.


तैमुरचे लवकरच बॉलीवूड पदार्पण


 


(सौजन्य- Instagram)