ADVERTISEMENT
home / मनोरंजन
त्या घटनेनंतर कपिल शर्माला कळले वेळेचे महत्व, सेटवर पहाटेच हजर

त्या घटनेनंतर कपिल शर्माला कळले वेळेचे महत्व, सेटवर पहाटेच हजर

प्रसिद्धी मिळाली तरी ती टिकवता आली पाहिजे असं म्हणतात. कपिल शर्माला हीच प्रसिद्धी पचवता आली नाही. वर्षभरापूर्वी एका घटनेनंतर त्याचे करीअरच दावणीला लागले. पण आता कपिलने कमबॅक केले असून आता त्याच्यात बराच बदल झाला आहे. आधी कधीही वेळेचे महत्व न जाणणारा कपिल आता वेळेच्या बाबतीत फारच सतर्क झाला आहे. कपिल शर्मा आता वेळा पाळायला शिकला असून तो नुकताच त्याच्या सेटवर पहाटे दिसला. त्यामुळेच कपिल सुधारला असे म्हटले जात आहे.

सिनिअर सिटीझन’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार मोहन जोशी

हाऊसफुल 4 च्या टीमसाठी आला लवकर

Instagram

ADVERTISEMENT

कपिल शर्मा शो सध्या जोरात सुरु आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी प्रमोशनसाठी येत असतात. हाऊसफुल 4 ची टीमही कपिल शर्माच्या शो मध्ये चित्रपटाचे प्रमोशन करायला येणार आहे. त्याच्याच शुटींगसाठी ही सगळी टीम आली होती. वेळेचा पक्का असणारा अक्षय कुमार ही या चित्रपटात आहे. त्यानेच या शुटींगची वेळ पहाटे 5 वाजताची ठरवल्यामुळे सगळ्यांना सकाळी येणे अगदी भागच होते. या शूटमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये म्हणूनच कपिलने सगळ्या टीमला पहाटेच सेटवर येण्याच्या सूचना दिल्या त्यामुळेच हे शुटींग लवकर सुरु झाले.

सगळे काम हल्ली वेळेवर

Instagram

कपिल शर्मा हल्ली सगळे काम वेळेवर करतो. त्याच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळेच त्याला त्याचा जास्तीत जास्त वेळ हा आपल्या बायकोला द्यायचा असतो. नुकताच गिन्नीचा बेबी शॉवर सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठीही अनेक कलाकार उपस्थित होते. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही गोड बातमी दिल्यापासूनच कपिल शर्मा आपल्या कामामध्ये अधिक लक्ष देतो. कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सीज पासून दूर राहण्याचा तो प्रयत्न करतो. 

ADVERTISEMENT

हा अॅपिसोड असणार खास

हाऊसफुल्ल सीरिजमधील हा चौथा भाग तितकाच हसवणारा असणार आहे असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बाला नावाचे कॅरेक्टर निभावत असून त्यावर आधारीत कॉमेडी या शोमध्ये केली जाणार आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. किकू शारदा हा रोल कॉमिक करणार असल्याचे देखील कळत आहे. हाऊसफुल 4 हा चित्रपट हा जुन्या काळातील थीमवर आधारीत आहे. रितेश, अक्षय, बॉबी, पूजा हेगडे, क्रीती खारबांदा या सगळ्यांचे काही जुने कॅरेक्टर असणार आहे. त्यांना आता आता या जन्मात त्या जन्माच्या सगळ्या गोष्टी आठवणार आहे असा काहीसा हा चित्रपट असणार आहे. शिवाय या मध्ये कॉमेडीचा एक्स्ट्रा तडका ही दिला जाणार आहे.

पण अक्षय पोहोचला नाही वेळेवर

 नेहमी वेळेवर असणारा अक्षय आणि त्याच्या वेळेवर येण्याच्या सवयीमुळे त्रस्त असलेले अन्य कलाकार नेहमीच त्याच्या या सवयीबद्दल सांगतात. पण पहिल्यांदाच अक्षयच्या आधी सगळी टीम पोहोचली होती. रितेश देशमुख, बॉबी देओल यांनी कपिल शर्माच्या सेटवरुनच एक व्हडिओ पोस्ट केला.या व्हिडिओमध्ये  त्याने अक्षय कुमार कुठे आहेस? असे विचारले आहे. त्यामुळे नेहमी वेळेवर असणारा अक्षय या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचला नाही हे नक्की!

गिन्नीच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल, सेलिब्रिटींनी लावली हजेरी

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
16 Oct 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT