कपिल शर्मा शोला नाव ठेवणाऱ्या मुकेश खन्नांना कपिल शर्माचे उत्तर

कपिल शर्मा शोला नाव ठेवणाऱ्या मुकेश खन्नांना कपिल शर्माचे उत्तर

कपिल शर्मा शो हा हिंदीतला सगळ्यात मोठा कॉमेडी शो आहे. या शोमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उत्साही असतात. पण शक्तिमान अर्थात ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्यानंतर त्यांनी मात्र या शोमध्ये जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मुकेश खन्ना यंनी नुसता नकार दिला नाही. तर त्यांनी हा शो अत्यंत ‘वाह्यात’ म्हटले. आता हा शब्द शोसाठी वापरल्यानंतर आता कपिल शर्माने मुकेश खन्ना यांना आता उत्तर दिले आहे. कपिल शर्मा नेमकं काय म्हणाला ते आता जाणून घेऊया.

#DDLJ ला 25 वर्षे पूर्ण, लंडनमध्ये उभारला जाणार राज-सिमरनचा पुतळा

मुकेश खन्नांनी नाकारला शो

Instagram

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये महाभारत या टीममधील अनेक प्रसिद्ध कलाकार आले होते. शकुनी मामा, दुर्योधन,श्रीकृष्ण, अर्जुन अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना पाहून अनेकांना आनंद झाला. पण या शोमध्ये भीष्म पितामहची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना आले नाहीत. त्यामुळेच हा विषय समोर आला. मुकेश खन्ना आणि महाभारतच्या इतर कलाकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कपिल शर्मा शो हा अत्यंत व्हायात असून यामध्ये दुहेरी अर्थाचे विनोद केले जातात जे मला पसंत नाही असे त्यांनी म्हटले. येथे येण्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांना फ्लॉप अभिनेता म्हणून संबोधण्यात आले. महाभारत पूर्वी त्यांची काहीही ओळख नसल्याचे या शोमध्ये म्हटले पण यावर कपिल किंवा इतर कोणत्याही सदस्यांनी बोलणे टाळले.

बधाई होनंतर आता येणार ‘बधाई दो’ राजकुमार आणि भूमी असणार मुख्य भूमिकेत

कपिल शर्माने दिले उत्तर

Instagram

मुकेश खन्ना यांनी कपिलच्या शोला वापरलेला तो शब्द त्याला फारच लागला. त्याने मुकेश खन्ना यांना या संदर्भात उत्तर दिले आहे. त्याने एका मुलखातीदरम्यान सांगितले की, माझे काम लोकांना हसवणे आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोकांना हसवणे फार गरजेचे होते. लोकांना हसवणे माझे काम आहे. आता प्रत्येकाची आवड आहे. काहींन हा शो आवडतो काहींना नाही. पण लोकांना हसवणे माझं काम आहे आणि ते मी कायम करत राहणार. त्यामुळे मला अजून कशातच लक्ष द्यायचे नाही पण कामात द्यायचे आहे. 

नेमकं काय म्हणाले होते मुकेश खन्ना

कपिल शर्मा शोबद्दल मुकेश खन्ना म्हणाले की,  या शोमध्ये मोठे अॅक्टर जात असतील पण मुकेश खन्ना जाणार नाही. हाच प्रश्न मला गुफीने विचारला होता रामायणाच्या टीमनंतर आता महाभारताच्या संपूर्ण टीमला ते बोलावणार आहेत. त्याचवेळी मी त्याला सांगितले होते की, तुम्ही सगळे जा पण मी याशोमध्ये येऊ इच्छित नाही. हा शो संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. पण असे असले तरी या शोपेक्षा व्हाईयात शो नाही. डबल मीनिंग विनोद. अश्लीलता, आणि पुरुषांनी महिलांचे कपडे घालणे असे सगळे यामध्ये घडते. त्यावर अनेक लोक हसण्याचे काम करतात. या शोमध्ये एकाला सिंहासनावर बसवून ठेवतात. त्यांचे काम आहे हसणे.हसायला येत नसेल तरी हसण्याचे काम करतात. अगोदर या खूर्चीवर सिद्धू बसायचे आता या जागी अर्चना बसतात. त्यांचे काम काय ? तर फक्त हसणे.. 


आता मुकेश खन्ना यांना या शोमध्ये पाहायला मिळणार नाही हे मात्र नक्की!

अनुराग कश्यपनंतर अभिनेत्रीने इरफान पठाणचे घेतले नाव, जाणून घ्या कारण