कपिल शर्माच्या घरी दुसरी गुड न्यूज, नाही थांबा कपिलने केला खुलासा

कपिल शर्माच्या घरी दुसरी गुड न्यूज, नाही थांबा कपिलने केला खुलासा


सेलिब्रिटींच्या घरी पाळणा कधी हलणार ही उत्सुकता अनेकदा त्यांच्या फॅन्सना असते. त्यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या लुकपर्यंत अनेक जण काहीही नसताना सोशल मीडियावर सतत चर्चा करत असतात. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या घरी दुसरा नवा पाहुणा येणार अशी गुड न्यूज सगळ्या सोशल मीडियावर पसरली. कपिल शर्माने एक ट्विट करत त्याच्या फॅन्सना एक प्रश्न विचारला आणि त्यावर कपिल शर्मा पुन्हा बाबा होणार असल्याच्या ट्विटने जोर धरला. कपिल शर्माकडे असलेली ही गुड न्यूज तो लवकरच शेअर करेल अशी अपेक्षा असताना कपिलने त्याचा खुलासा केला आहे. ही गुड न्यूज ऐकून त्याच्या फॅन्सना नक्कीच आनंद झाला असेल. जाणून घेऊया नेमकी ही गुड न्यूज आहे तरी काय?

सोहेल आणि अरबाज खान विरोधात या कारणामुळे FIR दाखल

कपिल शर्मा येतोय नव्या रुपात

तर कपिल शर्माची ही गुड न्यूज आहे नेटफ्लिक्सची संबधित. त्याने नवीन शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ही गोष्ट आता सिद्ध झाली आहे. कपिल शर्मा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून सगळ्यांनी जोडला जाणार आहे. त्याच्या करिअरची हीच बातमी शेअर करण्यासाठी त्याने ज्या क्रिएटिव्ह डोक्याचा विचार केला.त्यानुसार लोकांनी तो बाबा होणार यावर शिक्कामोर्तब केले. पण आता कपिलने नवा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सगळ्या गोष्टी फारच स्पष्ट झाल्या आहे. त्याने अफवांवर विश्वास ठेवू नका. ही आहे आनंदाची बातमी म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर तो त्याच्या या नव्या प्रोजेक्टची माहिती देताना दिसत आहे.

का उडाला गोंधळ

कपिल शर्माने नेटफ्लिक्सचा व्हिडिओ शेअर करण्याच्या काहीच दिवसांपूर्वी एक ट्विट शेअर केले होते. या ट्विटमध्ये त्याने ‘शुभ समाचार’ ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. हे ट्विट केल्यानंतर काहीच वेळात त्याने ट्विट करत याचे उत्तर दिले आणि म्हटले की, उद्या मी तुमच्यासोबत ही आनंदवार्ता शेअर करीन. त्याने गुड न्यूज असा ही उल्लेख केल्यामुळे अनेकांना तो पुन्हा एकदा बाबा होणार असे वाटले. त्यामुळेच अनेकांनी त्याच्या ट्विटचा अर्थ हा असा काढला. ज्यामुळे कपिल बाबा होणार या बातमीवर काही जणांनी शिक्कामोर्तबदेखील केले. आता कपिलनेच सगळीबाजू स्पष्ट केल्यानंतर ही गुड न्यूज काय आहे ते आतापर्यंत अनेकांना समजलेच असेल.

बॉलीवूडच्या या अभिनेत्री आहेत यशस्वी बिझनेस वुमन

कोणत्या रुपात येणार कपिल

कपिल नेटफ्लिक्सवर कोणत्या रुपात येणार आहे या अद्याप खुलासा झालेला नाही. पण हिंदीतूनच  तो लोकांशी संवाद साधणार आहे असे दिसत आहे. व्हिडिओमध्ये इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणारा कपिल अखेर हिंदीत बोलतो आणि मस्त देसी हिंदीमध्ये लोकांचे स्वागत करुन त्यांना ही आनंदाची बातमी देताना दिसत आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार कपिल शर्मा हा नव्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. 

एक था टायगर'फेम दिग्दर्शकाने गुपचूप उरकले लग्न, फोटो व्हायरल

कपिलची अनायरा झाली 1 वर्षांची

कपिलची अनायरा डिसेंबर 2020 मध्ये 1 वर्षांची झाली असून कपिल तिचे फोटो अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असतो. तिच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आणि ख्रिसमसचे फोटो कपिलने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले होते. त्यामुळे इतक्यात तरी कपिल शर्माच्या घरी दुसरी गुड सध्या तरी नाही. 


आता कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर येणार म्हटल्यावर नेमका कोणता विषय घेऊन येणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना असायलाच हवी.