लॉकडाऊनमध्ये मुलांसोबत घरात असलेल्या करण जोहरची मुलांसोबत भारीच मजा सुरु आहे. त्याने पोस्ट केलेले रुही आणि यशचे व्हिडिओ इतके खास असतात की, सध्या सगळ्यांचे लक्ष करण जोहरच्या यश आणि रुही यांच्यावर आहे. यश आणि रुही करण जोहरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कायमच सगळ्यांना दिसत असतात. कारण रुही आणि यश या तिकडीच्या व्हिडिओमुळेच आता सगळ्यांचे लक्ष या तिघांच्या इन्स्टा अकाऊंटवर असते. आता या तिकडीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. तोही खूप दिवसांच्या ब्रेकनंतर… आता ब्रेकनंतर परतलेल्या करण आणि रुहीला नेमकं काय म्हणायचं आहे ते नक्कीच जाणून घ्यायला हवं.
करण जोहरच्या मुलाने केली बोलती बंद, कोरोनाच्या काळात व्हिडिओ व्हायरल
आता तुम्ही जर करण जोहरचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असेल तर तुम्हाला लॉकडाऊनमध्ये त्याचे मुलांसोबतचे व्हिडिओ जास्त दिसतील. रोज Toodles असे म्हणत तो त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. रुही आणि यशचे करणसोबतचे सडेतोड बोलणे अनेकांना आवडते. म्हणूनच अनेक जण त्यांच्या व्हिडिओची वाट पाहात असतात. पण गेल्या काही दिवसांपासून करणने त्यांचे व्हिडिओ पोस्ट केले नव्हते. तर भूत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्यामुळे रुही आणि यशला अनेक जण मिस करत होते. मग काय करणने एक नवा व्हिडिओ शेअर करत रुही अॅण्ड यश आर बॅक असे म्हणत त्यांचा हा नवा व्हिडिओ पोस्ट केला.
आता करण जोहर आहेच निर्माता आणि त्याचे सगळे आयुष्य दिग्दर्शन आणि चित्रपटात गेल्यामुळे त्याच्या पोस्ट शेअर करण्यामध्येही एक वेगळा अंदाज असतो. रुही आणि यशचा एक व्हिडिओ शेअर करताना त्याने #lockdownwithjohars season2 coming soon चा उल्लेख केला होता. त्यामुळे तो काही दिवस त्यांचे व्हिडिओ पोस्ट करणार नाही हे कळले होते. पण नेमका त्याने हा व्हिडिओ शेअर केला आणि सीझन 2 चा उलगडा झाला.
आज करण जोहरची एक वेगळी ओळख मनोरंजन क्षेत्रात आहे. त्याचे स्टायलिश राहणे किंवा वेगवेगळ्या फॅशन कॅरी करणे हे कितीही स्वॅग वाटत असला तरी रुही आणि यशला मात्र करणचे कपडे फारच वेगळे वाटतात. म्हणूनच ते त्याच्या कपाटातील प्रत्येक गोष्टी या चांगल्या नाहीत असे म्हणतात. आता याचा राग करणला येतो असे अजिबात नाही. तर तोही त्यांच्या भावना समजून घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो.
सरोगसीचा आधार घेत बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आई - बाबा झाले आहेत. सिंगल पेरेंट होण्याचा मान आतापर्यंत तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओन,शाहरुख खान हे पालक झाले आहेत. करण जोहरला 2017 साली रुही आणि यश झाले. आता ते तीन वर्षांचे असून करण त्यांची आई आणि दोन मुलांसोबत राहतो.
तुम्ही जर करणच्या मुलांचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.