करण जोहरच्या मुलाने केली बोलती बंद, कोरोनाच्या काळात व्हिडिओ व्हायरल

करण जोहरच्या  मुलाने केली बोलती बंद, कोरोनाच्या काळात व्हिडिओ व्हायरल

सध्या सगळेच कोरोनामुळे घरात आहेत. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. याला बॉलीवूडचे सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. यापैकी बरेच सेलिब्रिटी आपले फिटनेस व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तर काही सेलिब्रिटी गात आहेत, काही सेलिब्रिटी घरातील कामं करताना व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तर काहींनी जेवण बनवतानाचे आपले व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यापैकी बरेच व्हिडिओ मजेशीर आहेत त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचाही वेळ जात आहे. पण सध्या सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहेत ते करण जोहरची मुलं यश आणि रूही जोहर. करण जोहर रोज यश आणि रूही जोहरचे व्हिडिओ पोस्ट करत असून रोजच्या आयुष्यात ही दोन्ही  मुलं काय धमाल करत आहेत आणि करण जोहरला कशी उत्तरं देत आहेत हे पाहून सर्वांनाच मजा येत आहे. यावर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीही कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीयेत. 

होम क्वारंटाईनमध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ अभिनेत्री करत आहेत योगा

कोरोना व्हायरस घालवणार अमिताभ बच्चन

View this post on Instagram

There is someone who can take away the #coronavirus

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

करणचे #toodles तर प्रसिद्धच आहेत. करण नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. आता तर रोज तो आपल्या  मुलांबरोबर वेळ घालवतो आहे आणि त्यांच्याबरोबरचे मजेशीर संवाद तो सध्या आपल्या इन्स्टावर पोस्ट करताना दिसून येत आहे. त्याच्या  मुलांचे हे व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये करण आपला मुलगा यशला ‘कोरोना व्हायरस’ बद्दल विचारताना दिसत आहे. त्यामध्ये करणने कोरोना व्हायरस कसा जाईल विचारले असता यशने दिलेले उत्तर फारच मजेशीर होते. त्यावर यशने सांगितले की, ‘अमिताभ बच्चन कोरोनाला व्हायरसला घालवू शकतील’. यावर करण जोहरला काहीच सुचले नाही. लहान मुलं अतिशय निष्पाप असतात याचंच हे उदाहरण आहे. तर एका व्हिडिओमध्ये यश त्याच्या आजीचे केस ओढायला न मिळाल्यामुळे रूसून बसल्याचंही त्याने सांगितलं. 

अमृता खानविलकरचा 'चोरीचा मामला'

View this post on Instagram

Hiroo and Roohi ❤️ #toodles #motherdaughter

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

बाबाने सिंपल कपडे घालायला हवेत

करणने यश आणि रूहीबरोबर झालेल्या संवादाचा अजून एक व्हिडिओ पोस्ट केला असून तोही फारच मजेशीर आहे. यशने हातात करणचे गुलाबी रंगाचे  शूज घेतले असून त्याला न आवडल्याचे स्पष्ट सांगितले. इतकेच नाही तर गुलाबी रंग हा रूहीसाठी असायला हवा असं पण सांगितलं. त्यानंतर करणच्या वॉर्डरोब असणाऱ्या  ठिकाणी ही दोन्ही मुलं खेळत होती. तेव्हा करणने यशला विचारलं ‘तुला बाबाचे कपडे आवडले का?’ त्यावरही यशने बिनधास्त नाही असं उत्तर दिलं. पण मजा मात्र तेव्हा आली जेव्हा करण म्हणाला ‘का नाही आवडले? डॅडाने कसे कपडे घालायला हवेत?’ त्यावर यशने ‘बाबाने सिंपल कपडे घालायला हवेत’ असं म्हणून करणची बोलतीच बंद केली. 

बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही भुरळ घातली आहे नव्या फ्लोरल साड्यांनी

सेलिब्रिटी देत आहेत कमेंट्स

View this post on Instagram

High tea with @hiroojohar ! #lockdownwiththejohars

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

करण शेअर करत असणाऱ्या व्हिडिओवर सध्या अनेक सेलिब्रिटी कमेंट्स करत आहेत. कोरोना व्हायरस घालवणार अमिताभ बच्चन असं सांगणाऱ्या व्हिडिओवर ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेकने ‘टू क्यूट’ अशी कमेंट केली होती. तर करणच्या मुलांना सगळेच निष्पाप, क्यूट अशी कमेंट देत आहेत. यश आणि रूही दोघेही अतिशय मस्तीखोर असून सध्या आपल्या बाबा आणि आजीबरोबर मजा मस्ती करत आहेत. नेहमीच कामात असणारा करण आता खऱ्या अर्थाने आपल्या दोन्ही मुलांना वेळ देत आहे. त्यांच्याबरोबर मस्ती करताना रोज दिसून येत आहे.