सध्या बॉलीवूडवर कोणी राज करत असेल तर तो आहे एकटा करण जोहर… अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती करणने केली आहे आणि आता करण आपलं नशीब एका वेगळ्या माध्यमातून आजमवणार आहे. करण जोहरने नुकताच नेटफ्लिक्ससोबत करार केला असून या करारान्वये तो नेटफ्लिक्सवर जोडला जाणार आहे आणि तो वेबसिरीजही तयार करणार आहे. लवकरच करण आपल्या वेबसिरीजचा श्रीगणेशा करणार आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर या संदर्भातील काही पोस्टसुद्धा शेअर केल्या आहेत
आता करण जोहर म्हटले की, आपल्याला सगळ्यात आधी आठवते ते धर्मा प्रोडक्शन पण धर्मा प्रोडक्शन नेटफ्लिक्सचा भाग बनणार नाही. तर धर्मा प्रोडक्शनचा dharmatic entertainment हा भाग नेटफ्लिक्ससोबत जोडला जाणार आहे. तसाच करार झालेला असून हा करार मोठ्या कालावधीसाठी करण्यात आल्याचे समजत आहे.
हल्ली लोकांना टीव्हीवरील मालिका पाहण्यापेक्षा सगळ्यात जास्त आवडते ते वेबसिरीज पाहायला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठी त्यांच्या आवडीच्या विषयावर आधारीत वेबसिरीज असतात. अगदी काही एपिसोडमध्ये असणाऱ्या या वेबसिरीज म्हणूनच पाहिल्या जातात. नेटफ्लिक्स आल्यापासून त्याचे जाळे इतक्या पटकन जगात पसरले आहे की, स्मार्टफोन वापरणाऱ्या सगळ्यांकडेच नेटफ्लिक्स आहे. म्हणून करण जोहरला या माध्यमातून अनेक लोकांशी जोडले जायचे आहे. आता या माध्यमातून तो अनेक वेबसिरीजची निर्मिती करणार आहे.
कबीर सिंगच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास रणबीर कपूर उत्सुक
आता करण पहिल्यांदाच वेबसिरीज करत नाही. तर त्याने आधीही वेबसिरीज केल्या आहेत. म्हणजे त्याने केलेली lust story नावाची वेबसिरीज चांगलीच गाजली होती. नेटफ्लिक्ससोबत टायअप करुन त्याने ती सिरीज केली. आता ऑफिशिअली टायअप केल्यानंतर करण ‘ghost stories’ नावाची एक सिरीज करत आहे. तो या कामाला लागला असून ही या सिरीजमध्ये चार दिग्दर्शक काम करणार आहेत या शिवाय त्याने किआरा अडवाणी सोबत एक चित्रपट करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
आता नेटफ्लिक्समध्ये इंटरेस्ट घेणारा करण जोहर एकटा नाही तर शाहरुख खानसुद्धा आहे. त्याने देखील दोन चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. बार्ड
ऑफ ब्लड आणि क्लास ऑफ 83 अशी या चित्रपटांची नावे आहेत. प्रियांका चोप्राला देखील काही चित्रपटांसाठी नेटफ्लिक्सने साईन केल्याचे कळत आहे.
तेलुगु सुपरहिट चित्रपट अर्जुन रेड्डी चा रिमेक बनवून करण जोहरने पैसा कमावला आहे. या रिमेकमध्ये शाहीद कपूर आणि किआरा अडवाणी यांचा लीड रोल होता. ही नवी जोडी प्रेक्षकांना दिसली आणि प्रेक्षकांची पसंती मिळाली.त्यामुळे करण जोहरला आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आवड असल्याचे कळत आहे.