पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकत्र

पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकत्र

'कुछ रिश्ते निभाने नही चुकाने पडते है...' अशी वरूण धवनच्या आवाजता कलंकच्या टीजरला सुरूवात होते. मोठंमोठ्या ठाकूरांच्या हवेल्या, राजेशाही थाट, तुटलेली नाती, प्रेम आणि बदला असा सगळा मसाला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा करण जोहरचा ‘कलंक’. निर्माता करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कलंक चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच रिलीज करण्यात आलं. संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. टीजरमध्ये दिसणारी अभिनेत्यांची झलक ही आकर्षक आहे. या टीजरमध्ये एक एक करून सर्व अभिनेत्यांचा परिचय देण्यात आलाय.सर्वात आधी समोर येते माधुरी दीक्ष‍ित जी सुंदर नृत्य करताना दाखवली आहे. हे नृत्य पाहून येते देवदासमधल्या माधुरीची आठवण. या नृत्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली आहे.


52873133 2307656432630259 9169485035688744760 n
वरुण धवन एका मोठ्या मैदानात रक्ताने माखलेला दाखवण्यात आलाय. हा सीन पाहून तुम्हाला बाहूबली सिनेमाची आठवण येईल. वरूणचा हा लुक पाहून कळतंय की, त्याने बॉडी बिल्डींगवर खास मेहनत केलीयं.


54512368 1096108687263447 956138547790945426 n


आदित्‍य रॉय कपूर एका नवऱ्या मुलाच्या पोषाखात दिसत आहे पण चेहऱ्यावरील भाव काहीसे हतबल आहेत. आलिया आणि त्याचं लग्न लागताना दाखवण्यात आलंय.


51879574 645998915835959 8423301657401511127 n


52337634 179245249721325 8553199989944661907 n


52016891 320514365335721 7899875448519030594 n


तर दुसरीकडे संजय दत्‍त एकटेपणाने ग्रासल्याच चित्र आहे. सोनाक्षीचं पात्र मात्र जास्त उलगडण्यात आलं नाहीयं.


52807213 1940548586053666 1596175699050165455 n
सर्व पात्र त्यांच्या लुकमध्ये परफेक्ट दिसत आहेत. हे टीजर रिलीज होताच ते व्हायरल झालं असून चांगला प्रतिसाद मिळतोय. टीजरमध्ये सोनाक्षी आणि आलियाचा लुक फारच हटके वाटतोय.20 वर्षानंतर माधुरी आणि संजय एकत्र येणार

तब्बल 20 वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. एकेकाळी या जोडीने बॉलीवूड गाजवलं होतं पण नंतरच्या काळात काही कारणास्तव ही जोडी एकत्र झळकली नाही. मात्र या चित्रपटात संजय दत्त बलराज चौधरीच्या भूमिकेत तर माधुरी बहार बेगमच्या भूमिकेत दिसणार आहे. एका मोठ्या कालावधीनंतर ही जोडी एकमेंकासोबत काम करत आहे. याशिवाय आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर आलिया भट आणि वरूण धवनचा एकत्रितपणे हा चौथा सिनेमा आहे. या सर्वांबरोबरच कियारा अडवाणी आणि कुणाल खेमूचीही या चित्रपटात भूमिका आहे.


जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणीकरणचा ड्रीम प्रोजेक्ट


Capture


काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील एक फोटो करणने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. तेव्हा त्याने हा चित्रपट आपल्या वडिलांचा आणि आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील कलाकारांचे लुक आऊट करण्यात आले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक बर्मन करत आहे. आधी हा चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार होता पण आता मात्र 17 एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा - 


आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत