करण जोहरला करायचंय कंगना रणौतसोबत काम

करण जोहरला करायचंय कंगना रणौतसोबत काम

कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यामध्ये मागील काही काळापासून 36 चा आकडा आहे. दोघांमधील वादाची दरी इतकी खोल आहे हे तेव्हा कळलं, जेव्हा कंगना रणौत केजोच्याच चॅट शोमध्ये आली आणि तिने केजोवर नेपोटीझमला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. तसंच हेही म्हटलं होतं की, ‘जर माझ्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यात आला तर त्यात तू खलनायक असशील.’ यानंतर दोघांच्याही फॅन्सना कळून चुकलं की, हा वाद काही लवकर संपणाऱ्यातला नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by [ A L I A B H A T T ❤️ ] ✨⭐️ (@i.aliabhatt) on
गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा संधी मिळाली तेव्हा कंगना रणौतने करण जोहर आणि त्याच्या निकटवर्तीयांवर खुल्लमखुल्ला शाब्दिक वार केले. तर करण जोहरनेही अनेक वेळा अवॉर्ड फंक्शन्समध्ये कंगनाची खिल्ली उडवली.

पण अचानक काय झालं माहीत नाही. करण जोहरने नुकतंच चक्क कंगना रणौतचं कौतुक केलं. ज्यामुळे कंगनालाही ऐकून आश्चर्य वाटेल.

नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये करण जोहरला विचारण्यात आलं की, त्याला कंगनासोबत काम करण्यास कंफर्टेबल वाटेल का?, त्यावर करणने सांगितलं की, ‘नक्कीच, मला कंगना रणौतसोबत काम करायला आवडेल.’ एवढंच नाहीतर ती या काळातली चांगल्या अभिनेत्रींपैकी एक आहे, असंही करण म्हणाला. तसंच या आधीही दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हाही त्याने असंच उत्तर दिलं होतं.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

The Queen Stuns as she gets ready to be a showstopper for Anushree Reddy at #LakmeFashionWeek2019 #LFWSR19 Styled by @stylebyami #KanganaRanaut


A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on
आता उत्सुकता आहे की, कंगना रणौतला करण जोहरच्या या उत्तराबद्दल कळल्यावर ती कसं रिएक्ट करते? या वादातील अजून एखादा अंक रंगणार की वादावर पडदा पडणार?


तुम्हाला काय वाटतं याबद्दल, करण जोहरच्या चित्रपटात कंगनाला बघायला आवडेल का? तुमचं काय उत्तर असेल आम्हाला नक्की कळवा.