व्हीजे अनुषा दांडेकर आणि अभिनेता करण कुंद्रामध्ये आला दुरावा

व्हीजे अनुषा दांडेकर आणि अभिनेता करण कुंद्रामध्ये आला दुरावा

मनोरंजन जगतातील अजून एक प्रेम कहाणीचा अंत झाल्याची चर्चा आहे. बातमी आहे की, व्हीजे अनुषा दांडेकर आणि टीव्ही अभिनेता करण कुंद्रा यांच्यातील नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. नेहमी एकत्र दिसणारे आणि दुसऱ्या कपल्सना प्रेमाचे धडे देणारे करण आणि अनुषा यांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला POPxoMarathi ने.

स्पॉटबॉयच्या बातमीनुसार करण आणि अनुषामध्ये काही आलबेल नसल्याचं कळतंय. सूत्रानुसार, करण आणि अनुषाच्या रिलेशनशिपमध्ये आता प्रोब्लेम्स येत आहेत. एवढंच नाहीतर बऱ्याच काळापासून हे दोघंही वेगळे राहत आहेत. तसंच फेब्रुवारी 2020 पासून त्यांनी एकही एकमेकांसोबतची पोस्ट शेअर केलेली नाही.

काही वर्षांपूर्वी करण आणि अनुषाने एकत्र राहायला सुरूवात केली होती. सुरूवातील हे दोघं बांद्र्यातल्या एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. त्यानंतर दोघांनी अंधेरीत घर घेतलं आणि तिथे एकत्र राहू लागले.

अनुषाला नुकत्याच एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये करण आणि तिच्या लग्नाच्या प्लॅनबाबत विचारण्यात आलं होतं. त्याचं उत्तर काही अनुषाने धड असं दिलं नाही. ज्यानंतर अनुषा आणि करणच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आलं आहे. या लाईव्हमध्ये अनुषाने म्हटलं की, माझ्या इन्स्टाग्रामवर तर प्रश्नांची सरबत्ती होत आहे. तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने एकच प्रश्न विचारला आणि तुम्ही सगळे खूपच क्युट आहात. या प्रश्नाच्या उत्तराबाबत मी हेच सांगेन की, जेव्हा पुढची कहाणी लिहीली जाईल तेव्हा मी तुम्हाला पानं उलटायला सांगेन, जसं परीकथांमध्ये असतं. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.

आता या उत्तरावरून नेमका काय अर्थ लावायचा हा प्रश्नच आहे. पण या दोघांच्या नात्यात नक्कीच काही ना काहीतरी प्रोब्लेम असल्याचं वाटतंय. अजूनही या दोघांचं नातं नेमकं का तुटलं याच्या कारणाचा खुलासा झालेला नाही. पण आशा आहे की, या कपलमधील दुरावा हा फक्त एखादा छोटा वाद असावा आणि या दोघांनी पुन्हा एकत्र यावं.

अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा हे एकमेकांसोबत बऱ्याच काळापासून आहेत. या दोघांनी 2015 साली डेटिंगला सुरूवात केली आणि नंतर एकत्र राहू लागले. दोघांच्या नात्याची ग्वाही त्याचे अनेक फॅन्स देतात. दोघांनी मिळून एक रिएलिटी लव्ह शो लव्हस्कूलही होस्ट आणि जज केला आहे.